Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबई हादरली! दादरमध्ये बायकोला ठार मारून नवऱ्याने स्वत:लाही संपवलं

12

Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Feb 2023, 7:41 pm

Mumbai couple died | डोक्यावर कर्जाचा डोंगर, मुंबईतील तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, पत्नीला मारून स्वत:च आयुष्यही संपवलं. दादरच्या गजबजलेल्या भागात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

Couple died in Mumbai
मुंबईत नवऱ्याने पत्नीला मारलं आणि आत्महत्या केली

हायलाइट्स:

  • विनोद याला एक मुलगी असून ती अकरावीत शिकते
  • मुलगी कॉलेजला गेल्यावर उचललं टोकाचं पाऊल
मुंबई: प्रत्येकाला आसरा देणारे शहर आणि स्वप्ननगरी अशी ओळख असलेल्या मुंबईत एका दाम्पत्याचा करुण अंत झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील दादर परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करुन स्वत:ही आयुष्य संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे दादर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दादरच्या सेनापती बापट मार्गावरील केसरी चाळीत ही घटना घडली. विनोद वसंत समजीस्कर (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी विनोदने त्याची पत्नी शुभांगी समजीस्कर हिची हत्या केली. या घटनेची वर्दी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना घरात विनोदने लिहलेली एक चिठ्ठी मिळाली. यामध्ये विनोदने, डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने मी पत्नीची हत्या करुन आयुष्य संपवत असल्याचे म्हटले आहे.
तुझ्या गर्लफ्रेंडनं…; सेल्फी पॉईंटवर गेलेल्या तरुणाला फोन, चेहरा पडला; नको ते करून बसला
या घटनेमुळे दादर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आता पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विनोद समजीस्कर याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. विनोद आणि शुभांगी यांना एक मुलगी आहे, ती अकरावीत शिकते. मुलगी कॉलेजमध्ये गेल्यावर विनोदने प्रथम शुभांगीची हत्या केली. त्यानंतर विष पिऊन आत्महत्या केली, असे सांगितले जात आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.