Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

A terrible accident सातारा: शिरवळजवळ भीषण अपघात; WagonR चा चक्काचूर, ३ ठार

9

हायलाइट्स:

  • पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात.
  • या अपघातात तिघे जागीच ठार झाले असून इतर दोघे जखमी झाले आहेत.
  • शिरवळजवळ धनगरवाडी येथे एका ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला.

सातारा: पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार झाले असून इतर दोघे जखमी झाले आहेत. शिरवळजवळ धनगरवाडी येथे एका ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. या धडकेत सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (three people lost lives in a tragic accident on the pune-bangalore highway in satara)

अपघाताची घटना घडल्यानंतर महामार्गाद्वारे जाणारे इतर प्रवाशांनी बचावकार्य सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. येथे मदतीसाठी आलेल्या नागरिकांनी अपघातग्रस्तांना गाड्यांमधून बाहेर काढले. या अपघातात एका ट्रकने वॅगनार या कारला जोरदार धडक दिली होती. या कारमधील कारमधील तिघे जागीच ठार झाल्याचे स्पष्ट झाले. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर खंडाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

क्लिक करा आणि वाचा- काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या जोरदार हालचाली; पश्चिम महाराष्ट्रात ‘हे’ चित्र

या अपघातात एकूण ६ गाड्यांना नुकसान झाले आहे. या सर्व गाड्या साताऱ्याहून पुण्याकडे जात होत्या. हा अपघात इतका भीषण होती की भरधाव ट्रकच्या धडकनेने वॅगनार कारचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त गाड्यांमध्ये दुधाचा टँकर, मालट्रक, स्कॉर्पिओ अशा वाहनांचा समावेश आहे. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही वेळासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.

क्लिक करा आणि वाचा- ‘खावाले काळ, नि भूईले भार’ म्हणजे ठाकरे सरकार; शेलारांचे टीकास्त्र

पोलीस आता अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याच्या प्रयत्नांत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- गडकोट संवर्धन हवे, पर्यटन, महसूल नको; खासदार संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांना विनंती

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.