Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

समृद्धी महामार्गावर भरधाव कार थेट संरक्षण कठड्यावर चढली, ३० फूट खोल पडता-पडता…; पाहा VIDEO

8

शिर्डी : समृद्धी महामार्गावर अपघाताची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे भरधाव वेगात असलेली कार थेट संरक्षण कठड्यावर चढली अन् खाली कोसळता कोसळता वाचली. अगदी थोडक्यात कार चालकाचा जीव वाचला आहे. या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही हादराल. खरंतर, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे दोन महिन्यांपूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या महामार्गावर वाहन चालकांना वेग मर्यादादेखील देण्यात आलेली आहे. परंतु काही वाहन चालक वेग मर्यादेचं उल्लंघन करताना दिसत असून अपघातांच्या संख्येतदेखील प्रचंड वाढ झाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सोमवारी दुपारी एक भरधाव कार समृद्धी महामार्गाच्या कोपरगाव येथील टोलनाक्याजवळ असलेल्या संरक्षण कठड्यावर चढली. यामध्ये संरक्षण कठड्याचा काही भाग फुटला असून कार अर्धी बाहेर आली होती. रस्त्यापासून पुलाची उंची २५ ते ३० फूट आहे. सुदैवाने संरक्षण कठड्याजवळ कार अडकल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. चालकदेखील यामध्ये बालंबाल बचावला आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

बापरे! नोटांची झाली चक्क माती; PNB बँकेचा लॉकर उघडताच महिला चक्रावली, सत्य कळताच फिरले डोळे…

याबाबत महामार्ग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कार चालक बाळासाहेब धरम हे एकटेच आपल्या कार क्र. एम एच १७ सीएम ४०७४ मधून औरंगाबादहून शिर्डीच्या दिशेने येत असताना सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि भरधाव कार समृद्धी महामार्गावर असलेल्या संरक्षण कठड्यावर जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की यात समृद्धी महामार्गाच्या संरक्षण कठड्याचा काही भाग कोसळला आहे.

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि चालकाला रुग्णालयात उपचारासाठी नेले. या अपघातात कारमध्ये असलेले कारचालक बाळासाहेब धरम हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

अनोळखी घरात कपाटातून बाहेर आली १४ वर्षीय बेपत्ता मुलगी, पोटात ५ महिन्यांचं बाळ अन्…
दरम्यान, समृद्धी महामार्गावर संरक्षण कठड्यावरती कार चढल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. तर काहीजण हे सर्व छायाचित्र मोबाईलमध्ये कैद करत होते. दरम्यान, महामार्ग पोलीस आणि समृद्धी महामार्गावरील कर्मचाऱ्यांनी मदत कार्य करत क्रेनच्या साहाय्याने ही कार संरक्षण कठड्यावरून बाजूला काढली.

गजानन महाराजांच्या प्रकटदिनीच शेगाव हादरलं, लाखोंच्या गर्दीत पोलिसांच्या हाती धक्कादायक वस्तू

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.