Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गजानन महाराजांच्या प्रकटदिनीच शेगाव हादरलं, लाखोंच्या गर्दीत पोलिसांच्या हाती धक्कादायक वस्तू

8

बुलडाणा : आज संत नगरी शेगाव इथं श्री गजानन महाराज यांचा १४५ वा प्रगटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. लाखोंच्या संख्येने भाविक संत नगरीमध्ये दाखल झाले आहेत. अशात याच दिवशी सगळ्यात मोठी कारवाई करण्यात आली असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा एलसीबी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी देशी पिस्टल, ४ जिवंत काडतूसांसह तिघांना पोलिसांनी जेरबंद केल्याने एकच खळबळ उडाली असून यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. संतनगरी शेगाव इथे आज १३ फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराजांचा प्रकटदिन साजरा होत असतांनाच खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे.

बापरे! नोटांची झाली चक्क माती; PNB बँकेचा लॉकर उघडताच महिला चक्रावली, सत्य कळताच फिरले डोळे…
बुलडाणा एलसीबी पथकाने तीन जणांना एक देशी पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसांसह अटक केली. आरोपी संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील तिघांपैकी एक जण अल्पवयीन आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव वरवट रोडवरील बुरुंगुले शाळेजवळ ही कारवाई करण्यात आली. पातुर्डा येथील शेख अकबर शेख हारून वय वर्ष २१, जिवन तेजराव गाडे वय वर्ष १८ आणि एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा असे तिघे रात्री साडे अकराच्या सुमारास मोटारसायकलने शेगावकडे येते होते. एलसीबी पथकाला याबाबतची माहिती मिळाली.

शेगावकडे येणाऱ्या तिघांजवळ देशी पिस्टल आणि जिवंत काडतुसं असल्याची गोपनीय माहिती सूत्रांनी एलसीबी पथकाला दिली. मिळालेल्या माहितीच्याआधारे, शेगाव वरवट रोडवरील बुरुंगुले शाळेजवळ एलसीबी पथकाने सापळा रचून तिघाही आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून १ देशी पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, १ मोटारसायकल, ३ मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींची कसून चौकशी केली असून देशी पिस्टल शेगावात विकण्याचा त्यांचा प्लॅन होता असे समोर आले आहे. तिघांही आरोपींच्या विरोधात शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकंदरी आज श्रींचा प्रगट उत्सव असताना त्याच दिनी ही घटना समोर येणे याच्या खोलात पोलीस प्रशासनाला जावे लागणार आहे.

कबड्डी खेळताना आऊट होऊन फिरताच खाली कोसळला, मालाडमध्ये तरुणाचा मृत्यू; घटनेचा Live Video समोर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.