Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

CM Fellowship: तरुणांना राज्याच्या विकासात योगदान देण्याची संधी, सीएम फेलोशिपबद्दल सर्वकाही जाणून घ्या

7

CM Fellowship Program: महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्रामअंतर्गत युवकांना राज्य सरकारसोबत काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अधिकृत वेबसाइटवर याचा तपशील देण्यात आला आहे. राज्याच्या विकासात योगदान देऊ इच्छिणाऱ्या तरुण आणि होतकरू मुला-मुलींनी या फेलोशिपमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

तरुणांसाठी संधी

राज्यातील तरुणांना त्यांच्या उर्जा, धैर्य, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून नवनवीन संकल्पना राबविण्यासाठी आणि प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव देणे हा या फेलोशिपचा उद्देश आहे. यासोबतच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना धोरणनिर्मिती, नियोजन, कार्यक्रम अंमलबजावणी यासंदर्भातील महत्त्वाचा अनुभवही मिळू शकणार आहे. २०१५ ते २०२० या कालावधीत यशस्वी अंमलबजावणीनंतर दोन वर्षांचे अंतर पडले. आता हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

पात्रता

मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते २६ वर्षे दरम्यान असावे. उमेदवारांना ग्रॅज्युएशनमध्ये ६०% गुण आणि किमान एक वर्षांचा अनुभव असावा. ऑनलाइन चाचणी, निबंध आणि मुलाखत यासारख्या त्रिस्तरीय चाचणीद्वारे गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. प्राप्त अर्जांमधून ६० तरुणांची मुख्यमंत्री फेलो म्हणून निवड केली जाईल. हे सर्वजण राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये आणि राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील.

आयआयटी, मुंबई आणि आयआयएम, नागपूर हे या कार्यक्रमाचे संस्थात्मक भागीदार (शैक्षणिक भागीदार) आहेत. फेलो या दोन्ही संस्थांमार्फत सार्वजनिक धोरणाशी संबंधित विविध विषयांचे अभ्यासक्रम पूर्ण करतील. यासाठी त्यांना आयआयटी, मुंबई आणि आयआयएम, नागपूर येथून स्वतंत्र पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची तपशीलवार माहिती अधिकृत वेबसाइट cmfellowship-mah@gov.in वर उपलब्ध आहे.
तसेच यासाठी ८४११९६०००५ हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. २ मार्च २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

MahaCet: परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवे प्रवेश पोर्टल
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना २० टक्‍के अभ्यासक्रम ऑनलाइन

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.