Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus 11 First Sale: वनप्लसच्या फ्लॅगशीप फोनचा आज पहिला सेल, पाहा किंमत – ऑफर्स

5

OnePlus 11, OnePlus Buds Pro 2 First Sale: OnePlus ने ७ फेब्रुवारी रोजी भारतात आपला नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन OnePlus 11 आणि OnePlus Buds Pro 2 लाँच केले होते. वनप्लस ११ स्मार्टफोन आणइ वनप्लस बड्स प्रो २ ची देशात आज १४ फेब्रुवारी २०२३ रोजी पहिला सेल होत आहे. वनप्लसचा लेटेस्ट फ्लॅगशीप फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅग 8 Gen 2 प्रोसेसर दिला आहे. हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, क्वॉड एचडी प्लस डिस्प्ले, 5000mAh बॅटरी सारखे फीचर्स दिले आहेत.

OnePlus Buds Pro 2 Price in India
वनप्लस बड्स प्रो २ ला भारतात ११ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले आहे. ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून खरेदी केल्यास ५०० रुपयाचा डिस्काउंट मिळेल. या ईयरबड्सला आज दुपारी १२ वाजेपासून वनप्लस स्टोर, अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

OnePlus Buds Pro 2 Specifications

वनप्लस बड्स प्रो 2 मध्ये 11mm डायनामिक ड्राइवर्स दिले आहेत. हे बड्स 48dB पर्यंत अॅक्टिव्ह नॉइज कँसिलेशन (ANC) आणि ट्रान्सपॅरेंसी मोड सपोर्ट करते. याशिवाय, या बड्स मध्ये 54ms लेटेंसी सोबत अल्ट्रा लो गेमिंग मोड आहे. OnePlus Buds Pro 2 मध्ये ट्रिपल मायक्रोफोन सेटअप दिले आहे. OnePlus Buds Pro 2 मध्ये प्रेशर-सेंसिटिव कंट्रोल दिले आहे. र्जिंग केस 520mAh च्या बॅटरी सोबत येते. या इयरबड् मध्ये 60mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः नव्या वर्षात नवीन फ्लॅगशीप फोन लाँच, पाहा कोणता स्मार्टफोन सर्वात जास्त पॉवरफुल ​

5000mAh ची बॅटरी

5000mah-

OnePlus 11 ला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. स्मार्टफोन मध्ये सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळते. फोनमध्ये डॉल्बी एटमॉस ऑडियो सपोर्ट सोबत स्टीरियो स्पीकर सेटअप दिले आहे. वनप्लसच्या दुसऱ्या स्मार्टफोन प्रमाणे या फोनमध्ये अलर्ट स्लाइडर आहे. परंतु, ३.५ एनएम ऑडियो जॅक फोनमध्ये मिळत नाही. या फोनला ग्रीन आणि ब्लॅक कलर मध्ये लाँच करण्यात आले आहे. कनेक्टिविटीसाठी ड्यूल-सिम, 5G, वाय-फाय 7 802.11 a/b/g/n/ac/ax, ब्लूटूथ 5.3, एनएफसी आदी फीचर्स दिले आहेत.

वाचाः Valentine’s Day deals : iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर स्पेशल ऑफर ​

स्न्रॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर

-8-gen-2-

वनप्लसच्या लेटेस्ट फ्लॅगशीप फोनमध्ये ऑक्टा कोर स्न्रॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर व ग्राफिक्ससाठी एड्रेनो 740 GPU दिले आहे. फोनमध्ये १६ जीबी पर्यंत रॅम व २५६ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. वनप्लस ११ स्मार्टफोन अँड्रॉयड 13 बेस्ड OxygenOS 13 सोबत येतो. वनप्लसच्या या फोनमध्ये Hasselblad ब्रँडिंगचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा सोनी IMX890 सेंसर दिला आहे. याशिवाय, ४८ मेगापिक्सलचा सोनी IMX581 आणि ३२ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स दिले आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे.

वाचाः Valentine’s Day Offer : जिओचा फेस्टिव्ह धमाका, फ्री मिळतोय १२ जीबी डेटा ​

OnePlus 11 Specifications

oneplus-11-specifications

नवीन वनप्लस ११ मध्ये ६.७ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. जो Quad HD+ (3216 × 1440 पिक्सल) रिझॉल्यूशन ऑफर करतो. स्क्रीनचा पिक्सल डेनसिटी ५२५ पीपीआय आणि रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज़ दिला आहे. फोनमध्ये LTPO एमोलेड डिस्प्ले दिला आहे. जो 1000 हर्ट्ज़ पर्यंत टच सँपलिंग रेट ऑफर करते. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला विक्टस दिला आहे. डिस्प्ले HDR10+ सपोर्ट आणि डॉल्बी विज़न कॉन्टेन्ट सुद्धा सपोर्ट करते.

वाचाः Jio यूजर्सची मजा, फक्त ९१ रुपयात २८ दिवस चालणार हा प्लान, ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

OnePlus 11 Price in India, Offers

oneplus-11-price-in-india-offers

वनप्लस ११ चा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची भारतातील किंमत ५६ हजार ९९९ रुपये आहे. हँडसेटला १६ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटला ६१ हजार ९९९ रुपये किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वार खरेदी केल्यास १ हजार रुपयाचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल. या फोनची विक्री दुपारी १२ वाजेपासून सुरू करण्यात आली आहे.

वाचाः ८४ दिवसाची वैधता, रोज २.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, पाहा स्वस्त रिचार्ज प्लान ​

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.