Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आधी क्रिकेट क्षेत्रातलं मोठं पद, आता शिक्षण क्षेत्रात एन्ट्री, रोहितदादांची ‘पॉवर’ वाढली!

14

अहमदनगर : कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची राज्य विधान मंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती केली आहे. विधी मंडळ सचिवालयाने नुकतेच आमदार पवार यांना नियुक्ती पत्र दिले आहे. पवार यांची अलीकडेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यापाठोपाठ आता पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती झाल्याने त्यांचे राजकीय महत्व वाढत चालल्याचे दिसून येते.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे रोहित पवार यांना आता ही नवी जबाबदारी मिळाली आहे. रोहित पवार यांनी सरकारकडे वेळोवेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे ‘एमपीएससी’ची परीक्षा बहुपर्यायी न होता ‘युपीएससी’च्या धर्तीवर वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. परंतु हा निर्णय लगेचच लागू न करता २०२५ पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती आणि त्यासाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या प्रश्नी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची व्यक्तीशः भेट घेऊन विद्यार्थ्यांची बाजू मांडली होती.

पुण्यात विश्रांतवाडी येथील बांधकाम पूर्ण झालेले शासकीय वसतीगृह तातडीने सुरु करण्याचा विषयावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील अडचणी दूर करण्याच्या विषयावरही त्यांनी आवाज उठवला आहे.

मेहंदीच्या कार्यक्रमात भेट, पाहताक्षणी प्रेमात, हिंदू-मुस्लिम धर्म विसरले, माणुसकी धर्माने रबाना-अमोलला एकत्र आणलं!
विविध पद भरती परिक्षेतील गोंधळ, पदवी आणि संबंधित अभ्यासक्रमाच्या तारखा, पदभरती, परिक्षा रद्द होणे, त्यातील चुकीच्या अटी, गोंधळ अशा अनेक विषयांवर पवार यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवला आहे. आता सरकारने त्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती केल्याने विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

जातीमुळे लग्नाला नकार, दोघांनी झोपेच्या १५ गोळ्या घेतल्या, त्यातून वाचले, घरच्यांनी लग्न लावलं..!
निवडीबद्दल रोहित पवार म्हणाले, ‘माझ्या पक्षाने आणि विधिमंडळाने माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल आभारी आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचाही मी आभारी आहे. अभ्यासक्रमापासून, परिक्षा शुल्क, वसतीगृह, स्कॉलरशीप, ॲडमिशन असे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांचे हे प्रश्न सोडविण्यासाठी आणखी जोमाने काम करू’ अशी प्रतिक्रिया आमदार पवार यांनी व्यक्त केली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.