Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

व्हॅलेंटाईनलाच डॉक्टर तरुणाने संपवलं आयुष्य, हॉस्टेलवरच इंजेक्शनच्या ओव्हरडोस घेतला अन्…

9

सोलापूर : सोलापूर शहरातील डॉ व्ही.एम. मेडिकल कॉलेजमध्ये पीजीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी हॉस्टेलमध्ये मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनेमुळे सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून एमडी भूलतज्ञच्या पदव्युत्तर कोर्स करत होता. डॉ.गौरव राजू वाखरे(वय २६ वर्ष, मूळ रा. अंबेजोगाई, जि बीड) असे त्याचे नाव आहे. हॉस्टेलमध्ये मृतदेह असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कळताच वरीष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.

हॉस्टेलमध्ये जाऊन कसून तपासणी करत पंचनामा केला आहे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, गौरव हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास माहिती मिळताच आम्ही हॉस्टेलवर गेलो. प्राथमिक माहितीनुसार, गौरव वाखरे याने इंजेक्शनद्वारे आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले आहे. पोस्टमार्टमनंतर अधिकृत माहिती समोर येईल.

Crime Diary : पती-मुलाच्या मृतदेहासमोरच बॉयफ्रेंडवर लुटलं शारिरीक प्रेम, वासना इथेच थांबली नाही तर…
दररोज सकाळी ओटीमध्ये हजर होण्याची वेळ होती. पण आज आलाच नाही…

डॉ गौरव वाखरे हा सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होता. डॉ व्ही एम मेडिकल कॉलेजमध्ये एमडी भूलतज्ञचे पोस्ट ग्रॅज्युएशनला प्रथम वर्षात त्याने प्रवेश घेतला होता. सिव्हिल हॉस्पिटलमधील बी ब्लॉक मागे असलेल्या होस्टेलवर राहावयास होता. पीजीच्या विद्यार्थ्यांना दररोज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये हजर होण्याची वेळ होती. डॉ गौरवच्या रूममधील इतर दोन विद्यार्थी आले. पण गौरव ओटीला आला नव्हता. अखेर विभाग प्रमुख डॉ पुष्पा अग्रवाल यांनी इतर दोन विद्यार्थ्यांना डॉ गौरव वाखरे का आला नाही, त्याला बोलावून आणा असे आदेश दिले. डॉ गौरवचे सहकारी डॉक्टर मित्र डॉ गौरवला बोलावण्यासाठी गेले असता तो निपचीत अवस्थेत पडला होता. विद्यार्थ्यांनी ताबडतोब विभाग प्रमुख व अधिष्ठाता यांना माहिती दिली.

समृद्धी महामार्गावर भरधाव कार थेट संरक्षण कठड्यावर चढली, ३० फूट खोल पडता-पडता…; पाहा VIDEO
इंजेक्शनचा ओव्हर डोस घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर…

प्राथमिक माहितीनुसार, पोलीस पंचनामा करताना असे निदर्शनास आले आहे की डॉ गौरव वाखरे याने इंजेक्शनचा ओव्हर डोस घेतला होता. पण पोस्टमार्टम झाल्याशिवाय अधिकृत माहिती सांगता येत नाही असे सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी दिली. त्यांचे नातेवाईक आले आणि त्यांची काही तक्रार असेल तर आम्ही दाखल करून घेऊन पुढील तपास करणार असल्याची माहिती दिली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत डॉ गौरव वाखरे बाबत पोलीस तपास सुरू होता. इतर सहकारी मित्र डॉक्टरांची विचारपूस सुरू होती.

व्हॅलेन्टाईन डे, परीक्षेचा तणाव अशा विविध अँगलने तपास सुरू…

डॉ. गौरव वाखरे याचे वडील राजू वाखरे हे अंबेजोगाई इथल्या एका शाळेत शिक्षक आहेत. भाऊ यशवंत वाखरे हा इंजिनिअर आहे. डॉ. गौरव वाखरे हा घरात सर्वात लहान व अविवाहित होता. वडील आणि भाऊ यांना माहिती मिळताच त्यांनी हे मंगळवारी सायंकाळी अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांच्या कार्यालयात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका डॉक्टराने आत्महत्या का केली? १४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात व्हॅलेन्टाईन डे म्हणून साजरा केला जातो. प्रेमभंग झाला आहे की काय याचाही तपास सुरू आहे व परीक्षेचा कार्यकाळ सुरू असल्याने डॉ गौरव हा परीक्षेच्या तणावात होता का? अशा विविध अँगलने तपास सुरू आहे. मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला असून नातेवाईकांना दाखवून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलरची दुचाकीला भीषण धडक; ३ जण जागीच ठार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.