Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुख्याध्यापकाने आयुष्य संपवलं, सर्वांनाच कोडं पडलं, अनेक महिन्यांची सल अखेर उघड

9

बीड : जिल्हा परिषदेमध्ये मुख्याध्यापक असलेल्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आली होती. मात्र त्यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट होतं. मात्र आता त्यांच्या मृत्यूचं गूढ उघड झालं आहे. बँकेच्या सततच्या पैसे फेडण्याच्या तगाद्याला कंटाळून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

आत्महत्या केलेले शिक्षक नितीन पाटोळे यांनी माजलगाव येथील मंगलनाथ मल्टिस्टेटच्या दिंद्रुड शाखेतून २०१९ मध्ये वैयक्तिक कर्ज घेतले होते. या कर्जाचा हप्ता दहा हजार रुपये इतका ठरला होता. काही महिने त्यांनी हप्ता व्यवस्थित फेडला, मात्र करोनाचा काळ सुरु झाला आणि त्यांचे अनेक हप्ते थकले गेले.

त्यावर देखील तोडगा काढून २०२२ पासून ते दहा हजार ऐवजी पंधरा हजार रुपये हप्ता भरू लागले. मात्र तरीही थकलेल्या हप्त्याबाबतीत बँक समाधानी नव्हती. थकलेले हप्ते लवकरात लवकर भरण्यासाठी बँकेने पाटोळे यांच्या मागे तगादा लावल्याचा आरोप आहे.

वेळोवेळी दहा ते पंधरा हजार रुपये करून हप्ता भरतोय असं सांगून देखील बँकेचे अधिकारी हप्त्यासाठी तगादा लावू लागले, या तगाद्याच्या विवंचनेतून पाटोळे यांनी अखेर टोकाचा निर्णय घेतला.

जागा बघायला आली नि कॉटेजवर घेऊन गेली, अलिबागमध्ये हनिट्रॅप, मुंबईत महिला जाळ्यात
नितीन पाटोळे हे बोडका येथील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक होते. त्यांनी या तगाद्यामुळे आसरडोह या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन लक्ष्मण (राहणार आसरडोह) यांच्या पक्षात आई-वडील, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे.

तरुणीच्या ‘त्या’ इच्छेमुळे कॉलबॉय वैतागला, न्यूड फोटो बाहेर, सोलापुरात तरुणावर गुन्हा
बँकेच्या अधिकाऱ्यांचा सततचा तगादा, आर्थिक परिस्थिती बिघडलेली, नोकरी असून बँक कर्मचारी सतत करत असलेला पाठपुरावा या सगळ्या गोष्टी नितीन पाटोळे यांना कुठेतरी जीवाला लागत होत्या. शेवटी कर्ज फेडण्याच्या आणि सततच्या तगाद्याने नितीन पाटोळे यांनी अखेर टोकाचा निर्णय घेतला. यामुळे जिल्हाभरात शिक्षण विभागात हळहळ व्यक्त केली जाते.

एक मंत्री सोडला तर बाकी कोणी काम करत नाही, सगळे खोट बोलतात; सुप्रियाताईंचे मंत्र्याना खडेबोल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.