Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Balasaheb Thorat daughter in Politics | गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर निवडणुकीच्यानिमित्ताने अहमदनगरच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. सत्यजीत तांबे काँग्रेसमध्ये परत येणार की नाही, याबाबत अद्याप साशंकता आहे.
हायलाइट्स:
- सत्यजीत तांबेंचं तळ्यात-मळ्यात
- बाळासाहेब थोरातांकडून मुलीचं राजकीय लाँचिंग
सोमवारी रात्री थोरात जेव्हा तालुक्यात परतले, तेव्हा त्यांचे जंगी स्वागत झाले. त्यावेळी डॉ. जयश्री यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना थोरात यांनी डॉ. जयश्री यांचा आवर्जून उल्लेख करून कार्यकर्त्यांनी डॉ. जयश्री यांना स्वीकारल्याचे आणि त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केल्याबद्दल आभार मानले. शिवाय डॉ. जयश्री आता इकडे म्हणजे राजकारणात चांगल्या रमल्या आहेत, असेही सांगून टाकले. याच कार्यक्रमात थोरात यांनी भाचे आमदार तांबे यांना काँग्रेसमध्ये परत येण्याचा सल्ला दिला. मात्र, दुसऱ्या दिवशी तांबे यांनी सूचक ट्विट करून वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर थोरात यांनी जाहीर कार्यक्रमांत आपल्या मुलीला राजकारणात उतरविल्याचे संकेत दिले आहेत. सत्यजीत तांबे यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला. पक्षाचा निर्णयही भविष्यात होईल. आता डॉ. जयश्री यांच्यासाठी काय तरतूद करणार? त्यांच्यासाठी थोरात स्वत: थांबणार का? त्यांचा पक्ष कोणता असणार? हेही आता हळहळू स्पष्ट होईल.
असाही सावध पवित्रा
डॉ. जयश्री यांच्या नावाने एक ट्विटर हँडल बऱ्याच दिवसांपासून कार्यरत होते. मधल्या राजकीय घडामोडीत त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करणारी पोस्ट करण्यात आली होती. त्याची चर्चा सुरू होताच. स्वत: थोरात यांनी दवाखान्यात असतानाही पुढाकार घेत ते अकाऊंट फेक असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार केल्याचेही म्हटले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.