Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यातील करोनाची स्थिरावलेली रुग्णसंख्या कमी का होत नाही?; पाहा, ताजी स्थिती!

18

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार १२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ७ हजार ४३६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण १९५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यातील करोनाची रुग्णसंख्या स्थिरावली असून कालच्या तुलनेत आज दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ६ हजार १२६ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ७ हजार ४३६ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, कालच्या तुलनेत मत्यूंच्या संख्येतही काहीशी वाढ झाली असून आज दिवसभरात एकूण १९५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 6126 new cases in a day with 7436 patients recovered and 195 deaths today)

आज राज्यात झालेल्या १९५ रुग्णांच्या मृत्यूंनंतरही मृत्यूदर मात्र गेल्या काही दिवसांपासून २.०१ टक्क्यांवरच स्थिरावला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख १७ हजार ५६० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६९ टक्के एवढे झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘१०२ व्या घटनादुरुस्तीमुळे मराठा आरक्षण मिळणार नाही’; अशोक चव्हाणांची नाराजी

पाहा, कोणत्या जिल्ह्यात किती सक्रिय रुग्ण!

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७२ हजार ८१० इतकी आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १५ हजार २१६ इतका आहे. त्या खालोखाल सांगलीत एकूण ७ हजार ४५६ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर, साताऱ्यात ही संख्या ६ हजार ७६४ इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात ५ हजार ९८४ सक्रिय रुग्ण आहेत. या खालोखाल अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार ९४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सोलापुरात ५ हजार ०२९ इतके रुग्ण आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ‘शिवसैनिकांचं ‘हे’ काय चाललंय?’; नीलेश राणेंचा शिवसेनेवर प्रहार

मुंबईत ५०३४ सक्रिय रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ०३४ इतकी आहे. तर, रायगडमध्ये २ हजार ३९१, रत्नागिरीत २ हजार ०१३, सिंधुदुर्गात १ हजार ७२१, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १ हजार ७५२ इतकी झाली आहे. बीडमध्ये १ हजार ६७९, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९११ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोनाकाळात मुंबईकरांना साथीच्या आजारांचा धोका; काळजी घेण्याचे आवाहन

नंदूरबारमध्ये फक्त ९ सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ७६५, नांदेडमध्ये ही संख्या ४३९ इतकी आहे. जळगावमध्ये ३९०, तसेच अमरावतीत ही संख्या ८२ इतकी आहे. तर यवतमाळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १४९ इतकी झाली आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या नंदूरबार जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ९ वर आली आहे.

४,४७,६८१ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ८७ लाख ४४ हजार २०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख २७ हजार १९४ (१२.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ४७ हजार ६८१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ९२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.