Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शानदार डिझाइन सोबत Oppo Find N2 Flip ची मार्केटमध्ये एन्ट्री, पाहा किंमत-फीचर्स

38

नवी दिल्लीः Oppo Find N2 Flip ला ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आले आहे. हा कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन आहे. ज्यात १२० हर्ट्जचा रिफ्रेश रेट दिला आहे. सोबत यात Hasselblad ब्रँडेड ५० मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. सोबत ८ जीबी पर्यंत रॅम आणि MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसर दिले आहे. जाणून घ्या या फोनची किंमत आणि फीचर्ससंबंधी.

Oppo Find N2 Flip ची किंमत
यूकेत या फोनला एकाच व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. हा ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज सोबत येतो. याची किंमत 849 Gbp म्हणजेच जवळपास ८४ हजार ३०० रुपये आहे. याला एस्ट्रल ब्लॅक आणि मूनलिट पर्पल शेड्स मध्ये लाँच केले आहेत.

वाचाः स्मार्टफोनमध्ये Malware आहे की नाही?, असं चेक करा, पाहा सोपी टिप्स

Oppo Find N2 Flip चे फीचर्स
Oppo Find N2 Flip Android 13 वर आधारित ColorOS 13.0 वर काम करतो. यात 120Hz डायनामिक रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन दिले आहे. सोबत ६.८ इंचाचा प्रायमरी फुल एचडी प्लस (1080×2520 पिक्सल) LTPO AMOLED डिस्प्ले दिला आहे. डिस्प्ले मध्ये HDR10+ सपोर्ट करतो. यात 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट दिला आहे. यात अॅल्यूमिनियम बिल्ड दिले आहे. कव्हर डिस्प्ले 382×720 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ३.२६ इंचाचा आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम सोबत मीडियाटेक डायमेंशन 9000+ प्रोसेसर दिले आहे. सोबत २५६ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे.

वाचाः Valentine Gift च्या नादात मुंबईतील महिलेची ३.६८ लाखांची फसवणूक, फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स पाहा

Oppo Find N2 Flip मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी सेन्सर दिला आहे. सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड शूटर दिले आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला आहे. Hasselblad- ब्रँडेड रियर कॅमेरा सोबत AI फोटोग्राफीसाठी MariSilicon X इमेजिंग NPU सपोर्ट दिले आहे. कनेक्विटीसाठी ५जी, ४जी एलटीई, वाय फाय ६, ब्लूटूथ व्ही ५.३, जीपीएस ए जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट सारखे फीचर्स दिले आहेत. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. Oppo Find N2 Flip मध्ये 44W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट सोबत 4300mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः उन्हाळा येतोय, त्याआधीच ४७४ रुपयात खरेदी कारा Portable Mini Cooler, पाहा डिटेल्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.