Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जिओ प्लानला टक्कर देण्यासाठी Airtel ने लाँच केला जबरदस्त प्लान

6

नवी दिल्लीः Bharti Airtel आणि Reliance Jio अशा दोन टेलिकॉम कंपन्या आहेत. ज्या कमी किंमतीत जास्त बेनिफिट्सचे प्लान्स देतात. एअरटेलने आता आपल्या यूजर्ससाठी १४९ रुपयाचा नवीन प्लान आणला आहे. टेलिकॉम कंपनीने गुपचूपपणे नवीन प्लान लाँच केला आहे. हा प्लान ओटीटी बेनिफिट्स सोबत येतो. एअरटेलकडे आधीच १४८ रुपयाचा प्लान आहे. परंतु, १४९ रुपयाचा प्लान आहे वेगळा आहे. हे दोन्ही डेटा ओन्ली पॅक आहे. १४८ रुपयाच्या प्लानचे फायदे अनेकांना माहिती आहेत. परंतु, १४९ रुपयाच्या प्लानमध्ये कोणते बेनिफिट्स मिळतात, जाणून घ्या.

Airtel Rs 149 Data Pack

Airtel च्या १४९ रुपयाच्या प्लानमध्ये फक्त १ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये कोणतीही स्टँडअलोन वैधता नाही. या प्लानची वैधता यूजर्सच्या पॅक इतकीच मिळू शकेल. म्हणजेच तुमच्याकडे ३० दिवसाचा प्लान असेल तर तुम्हाला वैधता ३० दिवसाची मिळेल. १ जीबी डेटा सोबत यूजर्सला ३० दिवसासाठी Xstream Premium चा अॅक्सेस सुद्धा मिळतो. Xstream Premium एअरटेलचा प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी यूजर्सला एकाच अॅप मध्ये १५ हून जास्त ओटीटी प्लॅटफॉर्म मिळतात.

वाचाः Valentine Gift च्या नादात मुंबईतील महिलेची ३.६८ लाखांची फसवणूक, फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स पाहा

या प्लानला आणण्यामागे कंपनीचा एकच उद्देश आहे तो म्हणजे जास्तीत जास्त Xstream Premium कडे लोकांना आकर्षित करणे. प्लानमध्ये फक्त १ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ज्याला डेटा पॅक हवा आहे. एअरटेलचा १४९ रुपये प्लानची सदस्यता घेतल्यास न केवळ यूजर्सला ३० दिवसासाठी एक्सस्ट्रीम प्रीमियमची सुविधा मिळते तर त्या यूजर्सला १ जीबी डेटा सुद्धा मिळतो. जर तुम्ही डेटासाठी प्लान घेत असाल तर १४८ रुपयाचा प्लान घेवू शकता. कारण, यात १५ जीबी डेटा मिळतो.

वाचाः Realme 9i 5G स्मार्टफोनला खरेदीची हीच योग्य वेळ, १४ हजार ४०० रुपयाची सूट

वाचाः उन्हाळा येतोय, त्याआधीच ४७४ रुपयात खरेदी कारा Portable Mini Cooler, पाहा डिटेल्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.