Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
iQOO Neo 7 भारतातील किंमत आणि ऑफर्स
या स्मार्टफोनची डिझाइन आधीच्या फोनशी मिळती जुळती आहे. परंतु, यात नवीन कलर्स दिले आहेत. यूजर्सला Interstellar Black आणि Frost Blue कलर ऑप्शन आहे. भारतात ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. याच्या टॉप मॉडलची १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३३ हजार ९९९ रुपये आहे. यूजर्सला १५०० रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट ऑफर मिळतो. या फोनचा भारतात सेल आजपासून सुरू करण्यात आला आहे.
वाचाः उन्हाळा येतोय, त्याआधीच ४७४ रुपयात खरेदी कारा Portable Mini Cooler, पाहा डिटेल्स
iQOO Neo 7 स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सँपलिंग रेट 300Hz आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, HDR 10+ आणि ब्लू लाइट सर्टिफिकेशन मिळतो. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 8200 SoC सोबत UFS 3.1 स्टोरेज आणि LPDDR5 रॅम टेक्नोलॉजी दिली आहे. फोन गेमिंग दरम्यान थंड राहावा यासाठी वेपर चेंबर प्लस मल्टी लेयर ग्रेफाइट शीट्स दिली आहे.
वाचाः Valentine Gift च्या नादात मुंबईतील महिलेची ३.६८ लाखांची फसवणूक, फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स पाहा
या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. प्रायमरी कॅमेरा सोबत २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला नाही. या फोनमध्ये फ्रंट मध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये व्लॉग मोड, ड्युअल व्ह्यू रेकॉर्डिंग मोड सारखे फीचर्स दिले आहेत. iQOO Neo 7 मध्ये 5000mAh च्या बॅटरी सोबत 120W चार्जिंग सपोर्ट दिले आहे. बॉक्समध्ये टाइप सी पोर्टचे चार्जर येते.
वाचाः जिओ प्लानला टक्कर देण्यासाठी Airtel ने लाँच केला जबरदस्त प्लान