Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्राअंतर्गत एकूण ४२ जागा भरल्या जाणार आहेत. मेडिकल ऑफिसरच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमबीबीएस किंवा पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. सिनियर ट्रिटमेंट सुपरवायझरची एकूण ५ रिक्त पदे भरण्यात येणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. लॅब टेक्निशियनची ५ पदे भरली जाणार असून उमेदवारांनी बी.एस्सी पूर्ण केले असावे.
टीबी हेल्थ व्हिसिटरच्या १३ जागा भरण्यात येणार असून या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार सायन्स ट्रिममध्ये ग्रॅज्युएट असावा. मायक्रोबायोलॉजिस्टची ४ पदे भरण्यात येणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एम.डी. मायक्रोबायोलॉजी, पीएच.डी. वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र किंवा एम.एस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.
पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिनियर लॅबोरीटी टेक्निशियनच्या २ रिक्त जागा भरण्यात येणार असून उमेदवाराने बी.एस्सी किंवा एम.एस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
फार्मासिस्टचे १ पद भरले जाणार असून उमेदवारांनी फार्मसीमध्ये पदवी/डिप्लोमा केलेला असावा.
पीपीएम कॉर्डिनेटरच्या २ जागा भरण्यात येणार असून यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. काऊन्सिलरचे १ पद भरण्यात येणार आहे. यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. स्टॅसिस्टिकल असिस्टंटची २ पदे भरली जाणार असून यासाठी उमेदवाराकडे डिप्लोमा आणि टायपिंग पूर्ण केलेले असावे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ७० वर्षांदरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना यामध्ये ५ वर्षांची सवलत मिळेल. उमेदवारांकडून १५० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून १०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार १५ हजार ५०० ते ६० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.