Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
असाच एक प्रकार कोकणात रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे घडला होता. अलिबाग येथील तरुणाला आपल्या जाळ्यात अडकवून त्याची व्हिडिओ क्लिप पाठवून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या एक महिला व पुरुषाला अलिबाग पोलिसांनी अवघ्या २४ तासांत फिल्मी स्टाइल सापळा रचून मुंबईत अटक केली होती. त्यानंतर आता अलिबाग येथे दुसरी तक्रार दाखल झाल्याने या जोडीच्या मुस्क्या परत आवळण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वापरण्यात आलेली मोडस ऑपरेंटीही सेम व आरोपीही तेच, असा प्रकार घडला आहे.
आधीच्या घटनेतील फिर्यादी तरुणाला अनेकदा संशयित आरोपी हे फोन करून पैशाची मागणी करीत होते. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. ११ फेब्रुवारीला फिर्यादीला फोन करून पाच लाखाची रक्कम आणण्यास सागितले होते. त्यानुसार आरोपी त्यांना मुंबईत बोलावले होते. पोलिसही सध्या वेशात त्याच्या आजूबाजूला पाळत ठेऊन होते. जागा बघण्याच्या उद्देशाने आलेली महिला जागा न बघता आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात त्याला ओढून कॉटेजवर दोघांनी मज्जाही केली आणि तिथेच त्याचा घात झाला. मोह जाळ्यात अडकलेल्या तरुणाकडे ५ लाखाची खंडणी मागून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना अलिबाग तालुक्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली. मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाख झाला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या.
अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील आणि पोलीस कर्मचारी यांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. ५ लाख रुपये कुणीकडे घेऊन यायचे ते संशयित आरोपी धनश्री ही फिर्यादीला सतत फोन करून सांगत होती. अखेर चर्चगेट रेल्वे स्टेशनवर बोलावले. त्यानंतर काही वेळाने महिलाही चर्चगेट रेल्वे स्टेशन येथे आल्याचे लक्षात आले. पोलीस पथकेही त्यांचे मागे जावून पुन्हा चर्चगेट रेल्वे स्टेशन परीसरात सापळा रचून लक्ष ठेवून होते. चर्चगेट रेल्वे स्टेशन येथील परिसरात काही वेळानंतर संशयित महिला ही फिर्यादीला भेटली. आणि अज्ञात आरोपीच्या येण्याची वाट बघण्याचे नाटक करू लागली. थोड्या वेळाने या महिलेचा भाचा हा सदर ठिकाणी येवून त्याने महिलेच्या सांगण्यावरून फिर्यादीकडून पैशांची पिशवी स्विकारली. तो जाण्यास निघाला असता पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर महिलेचा भाचा हा या गुन्ह्यात सामील नसल्याचे लक्षात आले.
त्यानंतर पोलीस पथकाने महिलेकडे अधिक चौकशी केल्यावर तपास करता महिलेने अलिबाग येथील राहणाऱ्या एका इसमाच्या सोबतीने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती समोर आली. यावेळी तात्काळ तपास पथकाने तांत्रिक तपासाची मदत घेवून पोयनाड पोलीस ठाणे हद्दीतील मौजे तळवडे ता. अलिबाग या गावात जावून गुन्ह्यातील आरोपीला तपासासाठी ताब्यात घेतले. सदर दोन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक करून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश सणस, अलिबाग पोलीस ठाणे, मांडवा सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक निरीक्षक राजीव पाटील, मांडवा सागरी पोलीस ठाण्याकडील पोसई डी.पी.खाडे, चेतन म्हात्रे, प्रशांत घरत, सुधीर पाटील यांच्या पथकाने हो मोठी कामगिरी फत्ते करत या प्रकरणाचा छडा लावला. दरम्यान, तरुणांनी अशा हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकू नका, असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे. या हनीट्रॅप प्रकरणात अडकवणाऱ्या या संशयित आरोपी जोडीने आणखी कोणाची फसवणूक झाली, असल्यास त्यांनी तक्रार देण्यासाठी समोर येणे आवश्यक आहे.