Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Google Layoff: गुगलकडून आता भारतातही कर्मचारी कपात, रात्री उशिरा ४५० जणांना कामावरून काढले

5

Google Layoff: गुगलने आता भारतातही कर्मचारी कपात सुरू केली आहे. अमेरिकेतील या दिग्गज टेक कंपनीने गुरुवारी रात्री उशिरा भारतातील विविध विभागांतील ४५० ते ४८० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कर्मचाऱ्यांची रिपोर्टिंग लाईन्स मजबूत होती किंवा ज्यांच्याकडे थेट व्यवस्थापक नव्हते त्यांना काढून टाकण्यात आले. यातील अनेक कर्मचारी हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये लेव्हल फोर सॉफ्टवेअर डेव्हलपर, बॅकएंड डेव्हलपर, क्लाउड इंजिनीअर आणि डिजिटल मार्केटर म्हणून काम करत होते. सूत्रांनी असेही सांगितले की, अमेरिकेत घडल्याप्रमाणे, भारतातील कर्मचाऱ्यांनाही मेल्सद्वारे कपातीची बातमी देण्यात आली. यावर गुगल इंडियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

गुगल इंडियाने कर्मचारी कपातीबाबत लिंक्डइनवर पोस्ट करणे सुरू केले आहे. आम्हाला कपातीचा फटका बसला असून आम्ही डिजिटल मार्केटिंगच्या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलत आहोत असे हरियाणातील गुरुग्राममधील गुगलचे व्यवस्थापक कमल दवे यांनी लिंक्डइनवर पोस्टमध्ये म्हटले आहे.

गुगलमधील आणखी एक कर्मचारी प्रोग्राम मॅनेजर, सप्तक मोहंता, यांनी लिंक्डइनवर पोस्ट केली आहे. काल रात्री सिंगापूर आणि भारतात गुगलच्या कपातीचा भाग म्हणून माझ्या अनेक सहकारी आणि मित्रांनी त्यांच्या नोकर्‍या गमावल्याचे पाहून निराश झालो. यातून सावरण्यासाठी प्रत्येकाला थोडा वेळ लागेल.गेल्या महिन्यात, टेक क्षेत्रातील प्रचंड कपातीच्या दरम्यान, गुगलने १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजनाही जाहीर केली होती.

या कर्मचारी कपाती संबंधित निर्णयांची संपूर्ण जबाबदारी घेत आहे, असे कर्मचार्‍यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले.आमचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी, कॉस्ट बेसमध्ये बदल करण्यासाठी आणि आमचे टॅलेंट आणि भांडवलास आमची सर्वोच्च प्राधान्य बनवण्याचा हा एक अतिशय महत्त्वाचा क्षण असल्याचेही ते म्हणाले.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, ही कर्मचारी कपात जागतिक आहे आणि यूएस कर्मचार्‍यांवर त्याचा तात्काळ परिणाम होईल. खर्चात कपात करण्याच्या एक भाग म्हणून उच्च अधिकार्‍यांच्या पगारात कपात केली जाईल, असेही पिचाई यांनी सांगितले.

Disney Lay Off: डिस्नेतून ७ हजार कर्मचार्‍यांना डच्चू, कंपनीचे नुकसान भरुन काढण्यासाठी निर्णय
SSC HSC Exam:…तर दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.