Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OPPO Reno 9 नव्हे तर थेट Reno 10 series होणार भारतात लाँच, पाहा डिटेल्स

35

नवी दिल्लीः OPPO Reno 9 series चीनमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. परंतु, भारतीय बाजारात याची वाट पाहत असलेल्या यूजर्सला अद्याप याची माहिती नाही की, ही सीरीज कधीपर्यंत भारतात लाँच होणार आहे. परंतु, आता एक नवीन माहिती समोर आली आहे. ‘Reno 10 series’ चे लीक इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. ताज्या रिपोर्टमध्ये OPPO Reno 10 आणि OPPO Reno 10 Pro+ दोन्ही स्मार्टफोन्सची स्पेसिफिकेशन्स शेअर करण्यात आली आहे.

OPPO Reno 10 series संबंधी ही लीक डिजिटल चॅट स्टेशनकडून समोर आली आहे. या वेबसाइटने ओपो रेनो १० आणि रेनो १० प्रो प्लस संबंधीचे महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्सवरून पडदा हटवला गेला आहे. कंपनीकडून आतापर्यंत या सीरीज संबंधी कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. परंतु, चर्चा आहे की, वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ओप्पोची ही नवीन सीरीज टेक मार्केटमध्ये एन्ट्री करू शकते.

OPPO Reno 10 Pro Plus
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, ओप्पो रेनो १० प्रो प्लस स्मार्टफोन 1220 x 2712 पिक्सल रिझॉल्यूशनचे १.५ के डिस्प्ले वर लाँच केले जाणार आहे. या फोनमध्ये ओएलईडी पॅनेलची स्क्रीन दिली जाणार असल्याचे समोर आले आहे. लीक नुसार, मोबाइल अँड्रॉयड १२ वर लाँच केला जाणार आहे. जो कलर ओएस १३ सोबत मिळून काम करेल.

वाचाः Vivo Y56 5G स्मार्टफोन भारतात गुपचूप लाँच, पाहा किंमत-फीचर्स

फोटोग्राफीसाठी ओप्पो रेनो १० प्रो प्लस मध्ये ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स ८९० प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर पाहायला मिळू शकतो. यासोबत बॅक पॅनेलवर ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक पेरिस्कोप लेन्स दिला जाणार आहे. लीक नुसार, पॉवर बॅकअपसाठी यात ४००० एमएएम क्षमतेची बॅटरी दिली जावू शकते. जी ८० वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सोबत मिळून काम करते.

वाचाः उन्हाळा येतोय, त्याआधीच ४७४ रुपयात खरेदी कारा Portable Mini Cooler, पाहा डिटेल्स

OPPO Reno 10
ओप्पो रेनो १० वरून असे म्हटले जात आहे की, या फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जावू शकतो. जो ओएलईडी पॅनेलवर असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी मोबाइल मध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जावू शकतो.

वाचाः Ind VS Aus सामना सुरू असतानाच ठप्प झाली Disney+ Hotstar ची सर्विस, यूजर्सचा संताप वाढला

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.