Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
iQOO Neo 7
पॉप्यूलर iQOO Neo 6 चे अपग्रेड व्हेरियंट iQOO Neo 7 मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ८२०० चिपसेट दिला आहे. फोनमध्ये जबरदस्त क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्लस प्रोसेसर दिले आहे. आयक्यूच्या या हँडसेटमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सरचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनची सुरुवातीची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. आयक्यूचा हा फोन एक चांगला ऑप्शन आहे.
वाचाः एका रिचार्जमध्ये चालवा दोन सिम, डेटा-कॉलिंग-SMS सह जबरदस्त बेनिफिट्स
प्लास्टिक बॅक पॅनेलचा वापर
फोनला बनवण्यासाठी प्लास्टिक बॅक पॅनेलचा वापर करण्यात आला आहे. या फोनमध्ये ६.७८ इंचाचा १२० हर्ट्ज HDR10+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये स्क्रीन (1080 x 2400 पिक्सल) रिझॉल्यूशन ऑफर करते. स्मार्टफोन अँड्रॉयड 13 बेस्ड FuntouchOS 13 सोबत येतो. हँडसेट मध्ये १२ जीबी पर्यंत रॅम व २५६ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
वाचाः स्मार्टफोनमध्ये Malware आहे की नाही?, असं चेक करा, पाहा सोपी टिप्स
Redmi K50i
२०२२ च्या सेकंड हाफ मध्ये लाँच करण्यात आलेला रेडमीचा Redmi K50i स्मार्टफोन सुद्धा ३० हजार रुपयांपेक्षा अर्ध्या किंमतीत येणारा बेस्ट गेमिंग फोन आहे. हँडसेट मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ८१०० चिपसेट दिला आहे. फोन MIUI 13 सोबत येतो. या फोनमध्ये ८ जीबी पर्यंत रॅम व २५६ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये रियरवर ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर उपलब्ध आहे. रेडमीच्या या फोनमध्ये 144 हर्ट्ज़ रिफ्रेश रेटचा LCD स्क्रीन दिला आहे. या फोनची किंमत २४ हजार ६९८ रुपयांपासून सुरू होते.
वाचाः Realme 9i 5G स्मार्टफोनला खरेदीची हीच योग्य वेळ, १४ हजार ४०० रुपयाची सूट
Poco F4
Poco F4 स्मार्टफोनला २०२२ मध्ये लाँच होणारा सर्वात बेस्ट मिड रेंज स्मार्टफोन पैकी एक आहे. हँडसेट क्वॉलकॉम स्नॅपड्र्रॅगन ८७० चिपसेट सोबत येतो. यात १२० हर्ट्ज फुलएचडी प्लस अमोलेड स्क्रीन दिली आहे. हँडसेट मध्ये ग्लास सँडविच डिझाइन दिली आहे. पोकोच्या या फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम व २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये डॉल्बी एटमॉस सोबत ड्युअल स्टिरियो स्पीकर्स दिले आहेत फोनमध्ये कमी प्रकाशात सुद्धा चांगले फोटो काढता येतात. या फोनची किंमत २५ हजार ९९९ रुपये आहे.
वाचाः जिओ प्लानला टक्कर देण्यासाठी Airtel ने लाँच केला जबरदस्त प्लान
Realme GT Neo 3T
रियलमीच्या GT Series ची सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे याचा परफॉर्मन्स आहे. रियलमीच्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर दिले आहे. हा फोन Redmi K50i सारखा पॉवरफुल नाही. परंतु, यात E4 AMOLED पॅनेल दिले आहे. या किंमतीत येणारा दुसरा फोन रियलमी जीटी नियो ३ टी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिले आहे.
वाचाः Valentine Gift च्या नादात मुंबईतील महिलेची ३.६८ लाखांची फसवणूक, फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स पाहा
Realme GT Neo 3T
Realme GT Neo 3T मध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. फोनच्या रियर पॅनलला प्लास्टिकने बनवले आहे. या डिव्हाइस मध्ये कोणत्याही प्रकारची हीटिंग मिळत नाही. परफॉर्मन्स मध्ये हा एक जबरदस्त व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन आहे. २०२३ मध्ये रियलमी जीटी नियो ३टी स्मार्टफोन ३० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारा बेस्ड मिड रेंज डिव्हाइस आहे. ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटच्या किंमतीत २४ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत २६ हजार ४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.
वाचाः 120W चार्जिंग स्पीड सोबत iQOO Neo 7 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत-फीचर्स पाहा
Nothing Phone (1)
नथिंग फोन (१) बाजारात उपलब्ध असलेला सर्वात जबरदस्त स्मार्टफोन पैकी एक आहे. जो सॉलिड परफॉर्मन्स ऑफर करतो. हँडसेट मध्ये स्नॅपड्रॅगन 778G+ चिपसेट दिला आहे. नुकताच लाँच करण्यात आलेला Poco X5 Pro स्मार्टफोनला याच प्रोसेसर सोबत लाँच करण्यात आले आहे. नथिंग फोन (१) यूनिक बॅक पॅनेल सोबत येतो. ज्यात अनेक सर्व एलईडी लाइट राहते. जो कॉल किंवा नोटिफिकेशन्स वर ऑन होते.
वाचाः Vivo Y56 5G स्मार्टफोन भारतात गुपचूप लाँच, पाहा किंमत-फीचर्स
नथिंग फोन १
नथिंग फोन १ मध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस १२० हर्ट्ज AMOLED स्क्रीन मिळते. स्मार्टफोन अँड्रॉयड १३ सोबत येतो. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी व ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स सोबत ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. स्मार्टफोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम व २५६ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ३५ हजार ९९९ रुपये आहे.
वाचाः जिओने आणला नवीन प्लान, १५२ रुपयात संपूर्ण महिना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा
३० हजारांपेक्षा कमी किंमतीत सर्वात बेस्ट फोन
३० हजारांपेक्षा कमी किंमतीत सर्वात बेस्ट फोन कोणता
स्पष्ट शब्दात सांगायचे झाल्यास ३० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत कोणता बेस्ट स्मार्टफोन आहे. याचे थेट असे कोणते उत्तर नाही. जर जास्त परफॉर्न्सचा फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही iQOO Neo 7 खरेदी करू शकता. तर प्रीमियम बिल्डचा फोन खरेदी करायचा असेल तर Poco F4 एक जबरदस्त ऑप्शन आहे. जो जवळपास सर्वच डिपार्टमेंट मध्ये जवळपास चांगला परफॉर्मन्स देतो. जर तुम्हाला २५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत दमदार गेमिंग फोन खरेदी करायचा असेल तर Redmi K50i एक जबरदस्त ऑप्शन आहे. किंवा तुम्हाला एक गेमर किंवा चांगला फोटो क्लिक करण्यासाठी फोन खरेदी करायचा असेल तर Realme GT Neo 3T किंवा Nothing Phone (1) पैकी एक डिव्हाइस खरेदी करू शकता.
वाचाः उन्हाळा येतोय, त्याआधीच ४७४ रुपयात खरेदी कारा Portable Mini Cooler, पाहा डिटेल्स