Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Vivo V27 India Launch
विवो कंपनी आपल्या ग्लोबल वेबसाइटवर व्ही २७ सीरीजचे लाँचिंग काउंटडाउन सुरू केले आहे. आणखी ८ दिवसांनंतर या सीरीजला भारतात लाँच केले जाणार आहे. या स्मार्टफोन सीरीजला ग्लोबली लाँच केले जाणार आहे. त्याचवेळी भारतीय बाजारात याला उतरवले जावू शकते. १ मार्च रोजी दुपारी १२ वाजता या सीरीजचा लाँचिंग इव्हेंट सुरू केला जाणार आहे.
वाचाः उन्हाळा येतोय, त्याआधीच ४७४ रुपयात खरेदी कारा Portable Mini Cooler, पाहा डिटेल्स
Vivo V27 Price
लीकमध्ये Vivo V27 आणि Vivo V27 Pro ची किंमत शेअर केली आहे. २७ हजार रुपयांच्या जवळपास ही किंमत आहे. तर प्रो मॉडल वरून हा फोन ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज आणि २५६ जीबी स्टोरेज सोबत येईल. याची किंमत ४० हजार रुपयाच्या जवळपास असू शकते.
वाचाः 5000mAh बॅटरी आणि ४८ मेगापिक्सलचे सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स
Vivo V27 Series Specifications
विवोकडून कंपनी वेबसाइट वर खुलासा करण्यात आला आहे की, या सीरीज मध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटचा ३डी डिस्प्ले दिला जाईल. जो कर्व्ड पॅनेलवर बनलेला असेल. या फोनचा फोटो अधिकृत केला आहे. ज्यात लूक आणि डिझाइन पाहिले जावू शकते. विवो व्ही २७ इंडियात लाँच होणारा पहिला स्मार्टफोन असेल ज्यात मीडियाटेक डायमेंसिटी ७२०० चिपसेटवर काम केले जात आहे. समोर आलेल्या डिटेल्सनुसार, हा फोन दोन मेमरी व्हेरियंट्स मध्ये येवू शकतो. बेस व्हेरियंट ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी स्टोरेज दिले जावू शकते. मोठा १२ जीबी रॅम सोबत २५६ जीबी इंटरनल स्टोरेज पाहायला मिळू शकतो. फोनला ब्लॅक रंगासोबत चेंजिंग ब्लू सोबत आणले जावू शकते.
वाचाः Facebook आणि Insta ची फ्री सर्विस बंद, ब्लूट टिकसाठी महिन्याला द्यावे लागतील इतके रुपये