Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus 11R ची आजपासून प्री-बुकिंग सुरू, ६ हजाराचे OnePlus Buds Z2 फ्री

6

नवी दिल्लीःOnePlus 11R Pre-Booking : वनप्लस कंपनीने भारतात ७ फेब्रुवारी रोजी लाँच केलेला नवीन स्मार्टफोन OnePlus 11R ची आजपासून प्री-बुकिंग सुरू केली आहे. या फोन सोबत कंपनी ५ हजार ९९९ रुपये किंमतीचे OnePlus Buds Z2 ईयरबड्स फ्री देत आहे. जाणून घ्या या फोनवर मिळत असलेल्या बँक ऑफर्स आणि अन्य माहिती संबंधी.

OnePlus 11R price
वनप्लसच्या ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजच्या OnePlus 11R ची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. तर १६ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४४ हजार ९९९ रुपये आहे. फोनच्या प्री ऑर्डरला आज दुपारी १२ वाजेपासून सुरुवात करण्यात आली आहे. या फोनला वनप्लसच्या अधिकृत वेबसाइटवरून, वनप्लस अॅप स्टोर, अमेझॉन इंडिया आणि वनप्लस एक्सपीरियन्सवरून प्री बुक करता येवू शकते. जर तुमच्याकडे सीटी बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर या फोनवर तुम्हाला १ हजार रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकतो. तसेच ICICI बँक यूजर्स सुद्धा क्रेडिट, डेबिट आणि ईएमआय ट्रान्झॅक्शन द्वारे १ हजार रुपयाची सूट मिळवू शकतात. तसेच या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना OnePlus Buds Z2 फ्री मिळेल.

वाचाः १ मार्चला लाँच होणार Vivo V27 Series, पाहा कोणकोणत्या फोनची होणार एन्ट्री

OnePlus 11R फोनची फीचर्स
OnePlus 11R मध्ये ६.७४ इंचाचा फ्लुड अमोलेड डिस्प्ले दिला आहे. जो कर्व्ड डिझाइन सोबत येतो. या फोनमध्ये स्क्रीन 1.5K रेजॉलूशन ऑफर करते. याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज़ आहे. स्क्रीन HDR10+ सर्टिफिकेश सपोर्ट करते. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये पंच होल दिला आहे. या फोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ प्लस झेन १ प्रोसेसर दिले आहे. ग्राफिक्ससाठी एड्रेनो 730 GPU फीचर दिले आहे. फोनमध्ये १६ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. फोनध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

वाचाः मोदी है तो मुमकीन है! सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये होणार, हे फायदे मिळणार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.