Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Free मध्ये IPL दाखवून जिओ कमावणार कोट्यवधी रुपये, कसं ते जाणून घ्या

23

नवी दिल्लीः यावर्षीच्या IPL 2023 च्या सर्व सामन्यांचे लाइव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमा द्वारे ऑनलाइन केले जात आहे. म्हणजेच जिओ यूजर्सला आयपीएलचे सामने कोणत्याही सब्सक्रिप्शन शिवाय एकदम फ्री मध्ये पाहता येवू शकणार आहेत. परंतु, आयपीएलचे सामने फ्री मध्ये दाखवून जिओ कंपनी कोट्यवधी रुपये कमावणार आहे. कसं ते या ठिकाणी जाणून घ्या.

एका सामन्यासाठी खर्च करावे लागणार २८ रुपये
इंडस्ट्री एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, आयपीएलचा कोणताही सामना ३ तास पर्यंत चालतो. मोबाइल अॅपवर सामना पाहण्यासाठी यूजर्सला कमीत कमी २ जीबी डेटाची गरज पडू शकते. भारतात जगातील सर्वात स्वस्त डेटा मिळतो, असे म्हटले जाते. परंतु, याची किंमत जवळपास १४ रुपये प्रति जीबी आहे. याचाच अर्थ जिओ अॅपवर क्रिकेट सामना पाहण्यासाठी जिओ यूजर्सला २८ रुपये खर्च करावे लागतील.

वाचाः Motorola G62 5G स्मार्टफोनला खूपच स्वस्तात खरेदीची संधी, पाहा डिस्काउंट

आयपीएलमध्ये एकूण ७० मॅच आहेत. चार प्लेऑफ मॅच ५२ दिवसात खेळवल्या जाणार आहेत. मोबाइल किंवा कनेक्टेड टीव्हीवर ७४ मॅच पाहण्यासाठी २ हजार ०७२ रुपयाच्या डेटाची गरज यूजर्सला लागणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या लेटेस्ट ग्राहक डेटा नुसार, रिलायन्स जिओच्या सक्रीय ग्राहकांची सध्याची संख्या ४२५ मिलियन आहे. या अॅपच्या हिशोबानुसार, यातील मिलियन मधील ग्राहक एक सामना जरी पाहत असतील तर त्यावर ११ हजार ९०० मिलियन रुपये खर्च करावे लागतील. मीडिया नेटवर्क आपल्या फ्री आयपीएलच्या माध्यमातून ५०० मिलियन यूजर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

वाचाः POCO M4 Pro 5G स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट, पाहा ऑफर

मीडिया रिपोर्टनुसार, जिओच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सर्व यूजर्सकडून मोबाइल फोनवर आयपीएलचे सर्व मॅच पाहण्याची अपेक्षा करीत नाही. सरासरी लोक एक तासांपेक्षा कमी वेळेत पाहतात. यासाठी ०.५ जीबीची आवश्यकता असते. इतका डेटा नेहमी सर्व ऑपरेटर्सच्या डेटा प्लानमध्ये उपलब्ध असतो.

वाचाः Airtel चा जोरदार झटका, सर्वात स्वस्त प्लान केला ५७ टक्के महाग

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.