Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

HP ने भारतात लाँच केला पॉवरफुल गेमिंग लॅपटॉप OMEN 17, पाहा किंमत-फीचर्स

6

नवी दिल्लीः HP OMEN 17 launched in india: HP ने भारतात आपला नवीन सर्वात पॉवरफुल गेमिंग लॅपटॉप OMEN 17 लाँच केला आहे. नवीन HP OMEN 17 ला 13th Gen इंटेल i9 प्रोसेसर सोबत लाँच करण्यात आले आहे. लेटेस्ट एचपी लॅपटॉप NVIDIA GeForce RTX 4080 GPU सोबत आणले आहे. या लॅपटॉप मध्ये १७.३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. जो QHD (2K) रेजॉलूशन ऑफर करतो. याचा रिफ्रेश रेट २४० हर्ट्ज आहे.

एचपीने या लॅपटॉपला OMEN टेम्पेस्ट कूलिंग टेक्नोलॉजी सोबत उपलब्ध केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या टेक्नोलॉजीच्या मदतीने हा लॅपटॉप OMEN Gaming Hub (OGH) सोबत डेस्कटॉप सारखा गेमिंग परफॉर्मन्स ऑफर करणार आहे. लेटेस्ट RTX GPU सोबत लॅपटॉप DLSS 3 (AI-बेस्ड अपस्केलिंग) टेक्नोलॉजी सपोर्ट करतो. जबरदस्त परफॉर्मन्स सोबत बॅटरी सुद्धा खूप कमी लागते. नवीन HP OMEN 17 मध्ये RGB लाइटिंग आणि मोठे ट्रॅकपॅड सोबत जबरदस्त कीबोर्ड दिले आहे. या लॅपटॉप मध्ये यूएसबी ए पोर्ट, यूएसबी टाइप सी पोर्ट, HDMI पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक सारखे फीचर्स मिळते.

वाचाः Free मध्ये IPL दाखवून जिओ कमावणार कोट्यवधी रुपये, कसं ते जाणून घ्या

नवीन एचपी लॅपटॉप मध्ये वाय फाय ६ ई कनेक्टिविटी दिली आहे. या लॅपटॉप मध्ये ड्युअल बँग आणि Olufsen स्पीकर सिस्टम मिळते. याशिवाय, डिव्हाइस मध्ये टेम्पोरल नॉइज रिडक्शन सोबत टेम्पोरल नॉइज रिडक्शन सोबत 720पिक्सल वेब कॅमेरा दिला आहे. यात इंटिग्रेटेड ड्युअल मायक्रोफोन मिळतो. HP OMEN 17 ला भारतात २ लाख ६९ हजार ९९० रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. हा लॅपटॉप OMEN प्लेग्राउंड स्टोर, एचपी वर्ल्ड स्टोर आणि एचपी ऑनलाइन स्टोर वर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येईल.

वाचाः रिचार्जपेक्षाही कमी किंमतीत येतात हे फोन्स, लावा पासून नोकियापर्यंत समावेश

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.