Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोबाइल गेम चाहत्यांसाठी गुड न्यूज; Road to Valor Empires मार्चपासून उपलब्ध होणार

3

नवी दिल्लीः PUBG आणि BGMI गेमचे भारतात जोरदार पुनरागमन होत आहे. जर टेक्निकल टर्म पाहिल्यास या गेमचे पुनरागमन होणार नाही. परंतु, त्या जागी नवीन गेम लाँच केला जाईल. परंतु, या दोन्हीची पॅरेंट्स कंपनी Krafton असणार आहे. जी लवकरच भारतात लवकरच एक नवीन गेमिंग अॅप लाँच करणार आहे. जो नवीन मोबाइल स्पेसिफिक गेम असणार आहे. या गेमचे टायटल Road to Valor Empires नावाने टीज करण्यात आले आहे. आम्ही भारतीय गेमर्सप्रती वचनबद्ध आहोत आणि भारतीय गेमर्सना आकर्षित करणारे नवीन व रोमांचक गेम्स सातत्याने आणत राहू, असे Krafton India आणि याचे सीईओ Sean Sohn यांनी म्हटले आहे. या गेमला Dreamotion ने बनवले आहे. ज्याला २०२१ मध्ये Crafton ने खरेदी केले होते.

काय आहे नवीन
हा गेम द एज ऑफ एम्पायर्स प्रमाणे दिसत आहे. ज्यात लोकल कॅरेक्टरला आणले जाणार आहे. यात प्लेअर ड्रॅगन सारखे पौराणिक लोक असतील. याचे टायटल वॉर मध्ये शत्रूच्या सैन्याला संपवायचे आहे. कंपनीच्या माहितीनुसार, Road to Valor Empires एक रिअल टाइम गेम आहे. रोड टू व्हॅलर: एम्पायर्स ह्या क्रॅफ्टनच्या भारतातील पहिल्या अनौपचारिक (कॅज्युअल) गेममध्ये खेळाडू सैन्य उभे करण्याच्या शोधात निघतात आणि काल्पनिक संरक्षक व सैनिकांना सूचना देऊन थरारक लढाया जिंकतात. हिंदी यूजर इंटरफेसची भर पडल्यामुळे खेळाडू आता ह्या आकर्षक दृश्य प्रवासाचा अधिक आनंद घेऊ शकतील. या ठिकाणी पौराणिक देवता, जनावरे आणि नायकांच्या कॅरेक्टर मध्ये येवून युद्ध करू शकतात.

रोड टू वेलोर पूर्णपणे फ्री असणार आहे. हिंदी भाषेत हा गेम उपलब्ध करून देण्यात आला आहेच. शिवाय, अन्य भारतीय भाषांमध्येही नंतर तो आणला जाणार आहे. याला गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. परंतु, काही या गेम आयटमसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. जर तुम्ही गेमिंगवर पैसे खर्च करीत नसाल तर या डिव्हाइस सेटिंग मध्ये जावून या अॅप पर्चेसिंगला बंद करू शकता. या ठिकाणी तसा ऑप्शन दिला आहे. रोड टू व्हॅलर: एम्पायर्स हा गेम रोड टू व्हॅलर:वर्ल्ड वॉर टू ह्या गेमच्या जागी सुरू करण्यात आला. जानेवारी २०१९ मध्ये सुरू झालेल्या ह्या गेमने ३ मिलियन (३० लाख) डाउनलोड्सचा टप्पा ओलांडला आहे.

नोटः Krafton चा सर्वात लोकप्रिय PUBG आणि BGMI (बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया) ला भारतात अँड्रॉयड स्मार्टफोन आणि आयफोन वर खेळू शकत नाही. या दोन्ही गेमवर भारत सरकारने सुरक्षेच्या कारणामुळे बंदी घातली होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.