Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राहूचा अशुभ प्रभाव आणि राहू ग्रहाचे वाहन
ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तिला घशाच्या वर डोक्यापर्यंत एखादा विकार जडला असेल तर राहूचा अशुभ प्रभाव असण्याचे संकेत आहे. राहू प्रभावित व्यक्ती मग्न राहते. एखाद्या अज्ञात भीतीने त्रस्त असते आणि नकारात्मक विचार पुन्हा पुन्हा डोकावतात. अशा परिस्थितीत चेटूक, चक्कर येणे, अपघात होण्याची भीती लोकांमध्ये राहते. ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाचे वाहन मांजर असे वर्णन केले आहे. घरात मांजरांचे वारंवार येणे किंवा घरासमोर मांजराचे वारंवार बसणे हे देखील राहूच्या प्रभावाचे लक्षण आहे.
राहूचा प्रभाव व्यक्तिला निष्काळजी बनवतो
राहूचा प्रभाव व्यक्तिला साफसफाईच्या बाबतीत निष्काळजी बनवतो. राहूच्या प्रभावामुळे माणूस घाणेरडे कपडेही घालू लागतो. स्वच्छतेची काळजी घेत नाही. कोणत्याही मार्गाने पैसे मिळवण्याची इच्छा आणि फसवणूक हा देखील राहूचा स्वभाव आहे. त्यामुळे राहू प्रभावित व्यक्ती हे करू लागतात. राहूच्या प्रभावामुळे व्यक्तीला नीट झोप येत नाही. वाईट स्वप्ने आणि विचार येतात. म्हणूनच जर तुम्हाला राहूच्या अशुभ प्रभावावर मात करायची असेल तर स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष द्या. घरातही घाण राहू देऊ नका, कारण राहू घाणीत राहतो असे मानले जाते.
राहू करतो असा प्रभाव
राहू हा असा अशुभ ग्रह आहे जो तुम्हाला पुन्हा पुन्हा संकटात टाकतो. अनेक वेळा अशी परिस्थितीत येते की, तुमच्यावर अचानक संकट कोसळतं, कळत नकळत धोका पत्करावा लागतो आणि नंतर तुम्हाला दुखापत आणि अपघाताला सामोरे जावे लागते. राहू आणि केतू हे नेहमी समोरासमोर असतात आणि एकमेकांचे मित्र म्हणून ओळखले जातात. म्हणूनच राहू प्रतिकूल असताना एखाद्या व्यक्तीला शस्त्रक्रिया, रक्तस्त्राव यासारख्या परिस्थितीतून जावे लागते. म्हणूनच राहूच्या महादशेत आणि प्रतिकूल संक्रमणामध्ये जोखमीच्या कामापासून दूर राहावे. तुटलेली काच आणि धारदार वस्तू सांभाळून ठेवाव्यात.
या राशींवर अशुभ प्रभाव
राहूच्या मेष राशीतील संक्रमणादरम्यान वृषभ, कर्क, कन्या, धनु, मकर, मीन या ६ राशींना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल. आरोग्य आणि आर्थिक बाबतीत समस्यांसोबतच त्यांना नात्यातही अडचणीला सामोरे जावे लागेल. मात्र ऑक्टोबरनंतर परिस्थिती बदलेल. ऑक्टोबरमध्ये राहू जेव्हा मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीला राहू त्रास देईल.
राहूचा अशुभ प्रभाव ‘या’ उपायांनी होईल कमी
१. राहूला शांत करण्यासाठी गोमेद धारण करावे. यासोबतच राहुच्या ॐ राम राहावे नमः या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा.
२. घरात फक्त आणि फक्त चंदनाच्या अगरबत्तीचा वापर करावा. यासोबतच चंदनाचा साबण, चंदनाचा सुगंध वापरावा आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी.
३. सोमवार किंवा शनिवारी शिवलिंगावर सव्वा किलो मुळा अर्पण करा. भगवान शंकराला मुळा अर्पण करण्यापूर्वी रात्रभर उशीवर ठेवा आणि नंतर सकाळी दान करा.
४. राहूचा प्रतिकूल प्रभाव दूर करण्यासाठी कुष्ठरोगी व्यक्तीला पैसे किंवा अन्न दान करा.
५. रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात उष्टी भांडी कधीही ठेवू नका. घराच्या खिडक्या आणि दारांचे काच तुटले असतील तर ते बदलून घ्या.
६. सट्टेबाजी, लॉटरी आणि इतर चुकीच्या सवयीपासून दूर राहा किंवा झटपट श्रीमंत होण्यासाठी मेहनत करा कारण राहू तुम्हाला श्रीमंत बनवण्याऐवजी गरीब बनवू शकतो.