Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Box Office Report: किंग खानने शहजादा अन् अँट मॅनला चारली धूळ; ‘पठाण’च्या जवळपासही नाही कमाई

14

मुंबई: यशराज फिल्म्सचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होऊन महिनाभराहून अधिक कालावधी उलटून गेला तरीही सिनेमाचा दबदबा कमी झालेला नाही. तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतलेल्या शाहरुखने आपला पुनरागमनाचा चित्रपट ऐतिहासिकरित्या ब्लॉकबस्टर करून दाखवला. पठाण वर्ल्डवाइड १०१२ कोटींच्या कलेक्शनसह आजपर्यंत जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवसापासूनच भारतात तसेच परदेशातही बॉक्स ऑफिसवर डंका गाजवला. अजूनही या चित्रपटाच्या यशाची गाडी अविरत चालत आहे.

पाचव्या शुक्रवारी देखील बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ दमदार कमाई करत आहे. दुसरीकडे मात्र कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ चित्रपटावर पठाणचा जबरदस्त परिणाम झालेला दिसतो. शहजादाला पठाण प्रमाणे बॉक्स ऑफिसवर गर्दी जमा करता आली नाही. शहजादा चित्रपटांसोबतच हॉलिवूडचा ‘अँट मॅन’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला देखील शहजादा चित्रपटाप्रमाणे फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

Ruchira Jadhav: ट्रोल्सनी पार केली हद्द, अभिनेत्रीच्या शॉर्ट पँटवर टीका; तिनंही केली बोलती बंद!
बॉलिवूडच्या आजपर्यंतच्या इतिहासात पठाण हा जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म युनिव्हर्सचा भाग असलेल्या ‘पठाण’मध्ये शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांसारख्या तगड्या कलाकारांनी काम केले होते. प्रदर्शनानंतरच्या पाचव्या शुक्रवारी चित्रपटाने १.२ कोटींची कमाई केली.

पठाणचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पुढील प्रमाणे

दुसरा आठवडा – ९०.०० कोटी रु.
तिसरा आठवडा – ४४.९० कोटी रु.
शुक्रवार (२४वा दिवस) – २.१५कोटी रु
शनिवार (२५ वा दिवस) – ३.२५कोटी रु
रविवार (२६वा दिवस) – ४.०० कोटी रु.
सोमवार (२७वा दिवस) – १.२५ कोटी रु.
मंगळवार (२८वा दिवस) – १.१० कोटी रु.
बुधवार (२९वा दिवस) – १.०० कोटी रु.
गुरुवार (३०वा दिवस) – १.०० कोटी रु.
शुक्रवारी (३१ वा दिवस)- १.२ कोटी रु.
एकूण कमाई -४९७.८५ कोटी रुपये

अजूनही आहे रितेश देशमुखच्या ‘वेड’ची हवा! अभिनेत्याची स्टाईल ठरली महाराष्ट्राची ‘फेव्हरेट’
‘शहजादा’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

२०२२ वर्ष कार्तिक आर्यनसाठी खूपच लकी ठरले. गेल्या वर्षी त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त सुपरहिट ठरले होते. त्यामुळेच कार्तिकला नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणारा शहजादा या चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होत्या. १७ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यात त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. बॉक्स ऑफिस वर प्रेक्षकांची गर्दी जमा करण्यासाठी शहजादाचा लढा अजूनही कायम आहे. रोहित धवन दिग्दर्शित ‘शेहजादा’ हा अॅक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाने २४ फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिसवर ४० लाख रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटाचे रात्रीचे शो केवळ ९% हाऊसफुल होते. आतापर्यंत या चित्रपटाला फक्त २७ कोटी जमा करण्यात यश आले आहे.

शहजादाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पुढील प्रमाणे

पहिला दिवस , शुक्रवार – ५.७५ कोटी रु.
दुसरा दिवस, शनिवार – ६.७५ कोटी रु.
तिसरा दिवस , रविवार – ७.५० कोटी रु.
चौथा दिवस, सोमवार – २.१५ कोटी रु.
पाचवा दिवस , मंगळवार – १.७५कोटी रु.
६ दिवस , बुधवार – १.५० कोटी रु.
७ दिवस , गुरुवार – १.१० कोटी रु.
एकूण कलेक्शन- रु. २६.५० कोटी

अँट-मॅन अँड द वास्प: क्वांटुमॅनिया’ बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘अँट-मॅन अँड द वास्प: क्वांटुमॅनिया’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ८.५० कोटींचा गल्ला जमवला. आठवड्याच्या अखेरीस या चित्रपटाने ३२ कोटी जमा केले. म्हणजेच दिवसाला या चित्रपटाने केवळ ६.५० कोटींची कमाई केली.

‘अँट-मॅन अँड द वास्प: क्वांटुमॅनिया’ बॉक्स ऑफिस कलेक्शन

पहिला दिवस , शुक्रवार – ८.५० कोटी रु.
दुसरा दिवस , शनिवार – ९.०० कोटी रु.
तिसरा दिवस , रविवार – ८.०० कोटी रु.
चौथा दिवस, सोमवार – २.२५ कोटी रु.
पाचवा दिवस , मंगळवार – रु २.०० कोटी
सहावा दिवस, बुधवार – १.९० कोटी रु
सातवा दिवस , गुरुवार – १.७५ कोटी रु.
आठवा दिवस , शुक्रवार – १.१९ कोटी रु.
एकूण कलेक्शन – ३४.५९ कोटी रुपये

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.