Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

MWC 2023 : जगातील सर्वात मोठा टेक शो आजपासून, जाणून घ्या डिटेल्स

6

नवी दिल्लीः आजपासून म्हणजेच २७ फेब्रुवारी पासून जगातील सर्वात मोठा टेक इव्हेंट मोबाइल वर्ल्ड काँग्रेसला सुरुवात होत आहे. MWC 2023 यावेळी खास होणार आहे. २७ फेब्रुवारी ते २ मार्च २०२३ पर्यंत चालणाऱ्या या टेक इव्हेंट मध्ये जगभरातील तमाम टेक्नोलॉजी पाहायला मिळू शकणार आहे. याशिवाय, अनेक प्रोडक्ट सुद्धा लाँच होणार आहेत. MWC 2023 मध्ये ओप्पो, शाओमी, डेल, नोकिया, सॅमसंग सारख्या कंपन्या सहभागी होत आहेत. MWC 2023 च्या आधीच शाओमीने Xiaomi 13, Xiaomi 13 Pro, Xiaomi 13 Lite ला ग्लोबली लाँच केले आहे. याशिवाय, MWC 2023 मध्ये नोकियाने ६० वर्षानंतर आपला लोगो बदलला आहे. जाणून घ्या सविस्तर.

कधीपर्यंत असणार MWC 2023 आयोजन

MWC 2023 चे आयोजिन २७ फेब्रुवारी ते २ मार्च २०२३ या दरम्यान होणार आहे. MWC 2023 मध्ये जवळपास ७५ हजार लोक पोहोचण्याची शक्यता आहे. याशिवाय, जवळपास २ हजार एक्झिबिटरचा समावेश होईल. जे आपल्या गॅझेट आणि टेक्नोलॉजीचे प्रदर्शन करतील. या कार्यक्रमात अॅपलने कधी सहभाग घेतला नाही. MWC 2023 मध्ये OnePlus, Realme, Oppo आणि Xiaomi सारख्या मोठ्या मोबाइल ब्रँड सहभागी करीत आहे. OnePlus ने आधीच MWC 2023 साठी आपल्या concept फोन ची घोषणा केली आहे.

Realme GT 3 ची लॉन्चिंग

MWC 2023 मध्ये Realme ने अपल्या फ्लॅगशिप Realme GT 3 च्या लाँचिंगची घोषणा केली आहे. Realme GT 3 ला 240W च्या फास्ट चार्जिंग सोबत आणले जाणार आहे. याशिवाय, RGB लाइटिंग डिजाइन मिळणार आहे. याच्यात कंट्रोल यूजर्सही असेल. Realme GT 3 फोन Realme GT Neo 5 चा री-ब्रांडेड व्हर्जन असेल.

वाचाः Airtel ने आणला Jio पेक्षा स्वस्त प्लान, १७९९ रुपयात वर्षभर वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा

Xiaomi 13, the Xiaomi 13 Pro आणि Xiaomi 13 Lite ची लॉन्चिंग
मोबाइल वर्ल्ड काँग्रेसच्या आधी Xiaomi ने Xiaomi 13, the Xiaomi 13 Pro आणि Xiaomi 13 Lite ला लाँच केले आहे. या तिन्ही फोनची लाँचिंग डिसेंबर २०२२ मध्ये चीनमध्ये झालेली आहे. पहिल्या दोन मॉडलमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर दिले आहे. तर Lite व्हर्जन मध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 प्रोसेसर दिले आहे.

वाचाः Nokia ने ६० वर्षानंतर आपला लोगो बदलला, लोगो आणि कलर संबंधी जाणून घ्या

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.