Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

BSNL चा ग्राहकांना झटका, कंपनीने बंद केले हे स्पेशल टॅरिफ व्हाउचर, पाहा डिटेल्स

22

नवी दिल्लीःBSNL Removes STVs from website: खासगी टेलिकॉम कंपन्यांना जोरदार टक्कर देणारी सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सुद्धा आता बरीच बदल करीत आहे. Bharat Sanchar Nigam Limited ने चार स्पेशल टॅरिफ व्हाउचर बंद केले आहेत. कंपनीने सध्या याची घोषणा केली नाही. परंतु, कंपनीच्या वेबसाइटवरून ७१ रुपये, १०४ रुपये, १३५ रुपये आणि ३९५ रुपयाचा प्लान हटवला आहे. हे प्लान जास्त पॉप्यूलर नव्हते. कंपनीला या प्लानमधून जास्त फायदा होत नव्हता. त्यामुळे कंपनीने या प्लानला हटवले आहे.

७१ रुपयाचा BSNL चा स्पेशल टॅरिफ व्हाउचर
७१ रुपयाच्या रिचार्ज पॅकमध्ये ३० पैसे प्रति मिनिट या हिशोबाप्रमाणे पैसे द्यावे लागतात. याचाच अर्थ यात फ्री कॉल आणि मेसेज मिळत नव्हते. याशिवाय, ग्राहकांना ३० दिवसासाठी २० रुपये सुद्धा वापरता येत होते. परंतु, हा पॅक त्यांच्यासाठी नाही. ज्यांना डेटा हवा आहे.

१०४ रुपयाचा BSNL चा स्पेशल टॅरिफ व्हाउचर
१०४ रुपयाचा बीएसएनएल पॅक मध्ये १८ दिवसासाठी फायदे ऑफर केले जाते. याशिवाय, या पॅक मध्ये डिस्काउंट कूपन मिळत आहे.

१३५ आणि ३९५ रुपयाचा BSNL चा स्पेशल टॅरिफ व्हाउचर
१३५ रुपयाचा पॅक मध्ये १४४० मिनिट कॉलिंग मिळते. यूजर्सला कोणत्याही नेटवर्कवर कॉल करता येवू शकतो. परंतु, ग्राहकांना या प्लानमध्ये कोणत्याही प्रकारचा डेटा मिळत नाही. या पॅकची वैधता २४ दिवसाची आहे. ३९५ रुपयाच्या एसटीव्ही पॅक मध्ये ३ हजार मिनिट कॉलिंग मिळते. हे कॉलिंग मिनिट संपल्यानंतर २० पैसे मिनिट या हिशोबाप्रमाणे पैसे द्यावे लागते. याशिवाय, प्लानमध्ये ७१ दिवसासाठी २ जीबी डेटा रोज मिळतो. परंतु, रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर ग्राहकांना 80Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरता येते.

वाचाः जगभरात या सहा Google Maps च्या फीचर्सची क्रेझ, भारत मात्र यापासून वंचित, जाणून घ्या

२६९ आणि ७६९ रुपयाचा रिचार्ज प्लान
टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी Festival Dhamaka Offer सुद्धा लाँच केली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर STV269 चा प्लान लिस्ट आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग, २ जीबी डेटा रोज सारखी सुविधा दिली जात आहे. या प्लानमध्ये १०० एसएमएस रोज, BSNL Tunes, Zing App अॅक्सेस, Eros Now Subscriptions सुद्धा दिले जाते. या प्लानमध्ये वैधता ३० दिवसाची मिळते.

वाचाः iPhone 13 वर फक्त आजच्या दिवशी बेस्ट ऑफर, अवघ्या ४२ हजारात खरेदीची संधी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.