Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
HSC Exam: बारावीच्या परीक्षेत शिक्षकांच्या मदतीने सामूहिक कॉपीचा प्रकार, भरारी पथक आल्यानंतर उडाली धांदल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी २७ फेब्रुवारीला बारावीची परीक्षा सुरू असताना भरारी पथकाने या ठिकाणी भेट देऊन तपासणी केली. या ठिकाणी काही विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळून आले आणि या सर्व प्रकाराला उपस्थित असणारे शिक्षक अप्रत्यक्ष रित्या जबाबदार असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकारानंतर पथकातील प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी यवत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. परिक्षा केंद्र संचालक जालींदर नारायण काटे, उप केंद्र संचालक रावसाहेब शामराव भामरे, प्रकाश कुचेकर, विकास दिवेकर, शाम गोरगल , कविता काशीद , जयश्री गवळी , सुरेखा होन, अभय सोननवर या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र गैरव्यहार प्रतिबंधक कायदा १९८२ महाराष्ट्र विदयापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परिक्षा कायदा १९८२ चे कलम ८ लावण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.
कॉपीच्या या प्रकारामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून एकाचवेळी ९ शिक्षकांवर कारवाई झाल्याने हे केंद्र राज्यात एकदम चर्चेत आले आहे. सदर घटनेचा तपास अंमलदार शेडगे करीत आहेत.