Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

JEE Main Result: जेईई मुख्य पेपर २ चा निकाल जाहीर,’या’ थेट लिंकवरून तपासा

14

JEE Main Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) च्या पेपर २ चा निकाल जाहीर केला आहे. पेपर २ म्हणजेच BArch आणि BPlanning परीक्षांमध्ये बसलेले सर्व विद्यार्थी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. विद्यार्थी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीखेच्या मदतीने निकाल तपासू शकतात.

याआधी एनटीएने जेईई मेन पेपर २ साठी उत्तरतालिका जाहीर केली होती. पुढे देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो करुन विद्यार्थी त्यांचा निकाल तपासू शकतात.

JEE Main Result: पुढील स्टेप्स करा फॉलो
स्टेप १- जेईई मुख्य पेपर २ चा निकाल पाहण्यासाठी, अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
स्टेप २- होमपेजवर तुमची क्रेडेन्शियल्स टाकून लॉगिन करा.
स्टेप ३- लॉगिन केल्यानंतर सबमिट करा.
स्टेप ४- सबमिट केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
स्टेप ५- निकाल तपासा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंटाउट घ्या.

सत्र २ ची परीक्षा एप्रिलमध्ये

यावर्षी जेईई मुख्य पेपर २ हा २८ जानेवारी २०२३ रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात आला होता. निकाल जाहीर करण्यापूर्वी, NTA ने अधिकृत वेबसाइटवर पेपर २ साठी उत्तरतालिका जारी केली होती. पेपर २ मध्ये निवडलेले सर्व विद्यार्थी बॅचलर इन आर्किटेक्चर आणि बॅचलर इन प्लॅनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ शकतील. जेईई मुख्य सत्र २ ची परीक्षा ६,७,८,९,१०,११ आणि १२ एप्रिल रोजी घेतली जाईल.

निकालाच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
UPSC EPFO Job 2023: कामगार मंत्रालयात नोकरी करण्याची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.