Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नागपूर सर्पदंश झालेल्या १० वर्षीय मुलाला मेयो आणि मेडिकलमध्ये नेल्यानंतर या दोन्ही शासकीय रुग्णालयांनी अॅन्टिव्हेनम इन्जेक्शन नसल्याचे सांगून त्याला उपचाराविनाच परत पाठविण्यात आल्याने बालकाची प्रकृती नाजुक झाली. त्यानंतर मुलाला लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याचे निधन झाले.Snake bite child dies due to lack of treatment
भरतवाडा येथील मानसी ले-आऊटमध्ये राहणारे राकेश मिश्रा यांचा १० वर्षाचा मुलगा आदर्श याला २८ जूनच्या पहाटे अडीच वाजताच्या सुमारास विषारी सापाने दंश केला. दंशानंतर मुलगा ओरडल्याने घरचे जागे झाले. त्यावेळी त्यांना तेथे साप दिसला. साप अतिविषारी असल्याने मुलाला वेदना वाढल्या आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे लगेच पंधरा मिनिटांत राकेश मिश्रा हे मुलाला घेऊन मेयो रुग्णालयात पोहोचले. मात्र, तेथे ‘आमच्याकडे अॅन्टिव्हेनम हे सर्पदंश झाल्यानंतर देण्यात येणारे इंजेक्शन नाही, तसेच व्हेंटिलेटरही उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्ही याला मेडिकलला घेऊन जा’, असे सांगण्यात आले.
त्यामुळे मेयोत सांगितल्यानुसार मुलाला तातडीने मेडिकलला नेण्यात आले. तेथे दीड-दोन तास मुलगा उपचाराची प्रतीक्षा करीत होता पण त्याच्यावर कोणतेच उपचार झाले नाहीत, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मेडिकलमध्येही, ‘आमच्याकडे अॅन्टिव्हेनम नाही तुम्ही बाहेरून घेऊन या’, असे सांगण्यात आले. तेवढ्या रात्री कुटुंबीयांनी परिसरातील औषध दुकानांमध्ये अॅन्टिव्हेनमचा शोध घेतला पण ते मिळाले नाही. दरम्यान, उपचारच सुरू न झाल्याने मुलाची प्रकृती खालावत होती. शेवटी एका खासगी रुग्णालयात व तेथून लता मंगेशकर रुग्णालयात मुलाला नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
मेयो आणि मेडिकलमध्ये अॅन्टिव्हेनम इंजेक्शन नसल्याने मुलावर वेळेत उपचार सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. चौथ्या वर्गात शिकणाऱ्या आकाशला आई, वडील, भाऊ व बहीण आहे.
चौकशी समिती
मेडिकलमध्ये २ हजाराच्यावर अॅन्टिव्हेनम इंजेक्शन्स उपलब्ध आहेत तसेच व्हेंटिलेटरही आहे. तरीही मिश्रा कुटुंबीयांना त्यावेळी वॉर्डातील डॉक्टरांनी असे उत्तर देण्याचे कारण नाही. मात्र, असे घडले असेल तर हे गंभीर आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करण्यासाठी आम्ही समिती गठीत केली आहे. समितीच्या अहवालानुसार कुणी दोषी आढळले तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे मेडिकलचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी ‘मटा’ला सांगितले.