Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Xiaomi 13 Pro लाँच होताच, Xiaomi 12 Pro स्मार्टफोनच्या किंमतीत १० हजार रुपयांची कपात

17

नवी दिल्लीः शाओमीकडून एक प्रीमियम स्मार्टफोन Xiaomi 13 Pro ला भारतात लाँच करण्यात आले आहे. या फोनला लाँच करण्यात आल्यानंतर Xiaomi 12 Pro च्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. शाओमी १२ प्रो स्मार्टफोनला एप्रिल २०२२ मध्ये लाँच करण्यात आले होते. फोनमध्ये 4,600mAh ची बॅटरी दिली आहे. सोबत ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा फोन शाओमीचा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे. याला आता स्वस्तात खरेदी करू शकता.

Xiaomi 12 Pro स्मार्टफोनची किंमत
शाओमी १२ प्रो स्मार्टफोनचे बेस ८ जीबी रॅम मॉडलची वास्तविक किंमत ६२ हजार ९९९ रुपये आहे. तर १२ जीबी रॅम मॉडलची किंमत ६६ हजार ९९९ रुपये आहे. या फोनच्या किंमतीत १० हजार रुपयाची कपात करण्यात आली आहे. यानंतर Xiaomi 12 Pro स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम मॉडलची किंमत ५२ हजार ९९९ रुपये आहे. तर १२ जीबी मॉडलची किंमत ५६ हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत मिळतोय Lenovo i3 Laptop, आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट

डिस्काउंट आणि ऑफर

या फोनला HDFC बँक कार्ड वर ३ हजार रुपयाचा डिस्काउंट आणि ३ हजार रुपयाचा एक्सचेंज ऑफर वर खरेदी करू शकता. जर तुम्ही रेडमी आणि शाओमी स्मार्टफोनचे ऑनर असाल तर तुम्ही या फोनला एक्सचेंज करून ५ हजार रुपयाची सूट मिळवू शकता. यानंतर शाओमी १२ प्रोच्या ८ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत ४७ हजार ९९९ रुपये राहते. सोबत १२ जीबी मॉडलची किंमत ५१ हजार ९९९ रुपये राहते. शाओमी १२ प्रो स्मार्टफोनला तुम्ही mi.com, Amazon.in, Mi home stores आणि ऑफलाइन स्टोर वरून खरेदी करू शकता.

वाचाः Airtel ला या प्लानमधून Jio चे तगडे आव्हान, महिनाभर वैधता, कॉलिंग आणि डेटाची सुविधा

Xiaomi 12 Pro चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये ६.७२ इंचाचा WQHD+ E5 एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट सपोर्ट 120Hz आहे. तर पिक ब्राइटनेस लेवल 1,500 nits आहे. फोन डॉल्बी विजन आणि HDR10+ सपोर्ट सोबत येतो. फोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर Snapdragon 8 Gen 1 SoC आणि एड्रिनो 730 GPU सपोर्ट दिले आहे. शाओमी १२ प्रो स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड 13 बेस्ड MIUI 14 वर काम करतो. फोनमध्ये एक 50MP Sony IMX707 प्रायमरी सेन्सर दिला आहे. ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन सपोर्ट सोबत येतो. याशिवाय, 50MP अल्ट्रा-वाइड सेंसर सपोर्ट दिले आहे. 50MP टेलीफोटो सेंसर सपोर्ट मिळतो. फोनमध्ये फ्रंटला एक 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 4,600mAh ची बॅटरी दिली आहे. जी 120W हायपर चार्ज सपोर्ट सोबत येते.

वाचाः Women’s Day: मैत्रिणीला-बायकोला गिफ्ट करण्यासाठी बेस्ट आहेत हे ५ स्मार्टफोन

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.