Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१० इंचाचा स्वस्त टॅबलेट भारतात लाँच, रियलमी, रेडमी आणि मोटोच्या Pad ला देणार टक्कर

9

नवी दिल्लीः पॉप्यूलर ब्रँड iTel ने टॅबलेट सेगमेंट मध्ये एन्ट्री केली आहे. कंपनीने iTel Pad One नावाने आपला पहिला टॅबलेट लाँच केला आहे. हा नवीन डिव्हाइस अनेक शानदार फीचर्स सोबत येतो. भारतीय बाजारात iTel Pad One ची टक्कर Redmi Pad, Realme Pad Mini आणि Moto Tab G60 शी होईल. iTel Pad One मध्ये एचडी प्लस रिझॉल्यूशनचा १०.१ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याच्या स्क्रीनच्या चारही बाजुंनी रुंद बेजेल्स आहेत. हा टॅबलेट बॉक्सी फॉर्म फॅक्टर सोबत मेटल यूनिबॉडीसोबत येतो.

iTel Pad One ची फीचर्स
या टॅबलेटच्या बॅक पॅनेलवर स्कॉयरिश कॅमेरा सेटअप दिला आहे. याच्या कॅमेरा मॉड्यूल मध्ये फ्लॅश सोबत 5MP चा प्रायमरी सेन्सर दिला आहे. तर टॅबलेट मध्ये फ्रंट मध्ये ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल फ्रंट स्नॅपर दिला आहे. याशिवाय, या टॅबलेट मध्ये ड्युअल स्पीकर दिले आहे. iTel Pad One यूनिसोक SC9863A1 ऑक्टा-कोर प्रोसेसर सोबत येतो. यात 4GB RAM आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे. गरज पडल्यास स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. iTel Tablet मध्ये 6,000 mAh ची बॅटरी दिली आहे. जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.

वाचाः OnePlus चा हा Smart TV स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पाहा जबरदस्त ऑफर

iTel Pad One मध्ये कनेक्टिविटीसाठी 4G VoLTE, WiFi, ब्लूटूथ, 3.5 mm jack, FM आणि OTG सपोर्ट दिले आहे. हा टॅबलेट नॅनो सिम कार्डला सपोर्ट करतो. भारतात या टॅबलेटची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. याला डीप ग्रे आणि लाइट ब्लू कलर ऑप्शन मध्ये आणले गेले आहे. या टॅबलेटला कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि देशातील खास ऑफलाइन स्टोर्सवरून खरेदी करू शकता. टॅबलेटला खरेदी केल्यानंतर 10W चार्जर, USB केबल, कव्हर एयर सिम इजेक्टर पिन मिळेल.

वाचाः 32MP फ्रंट कॅमेरा आणि 66W फास्ट चार्जिंगचा Vivo V27e स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत

वाचाः Nothing Phone 2 ची पहिली झलक, कंपनीच्या CEO ने सांगितले कसा असेल फोन

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.