Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

JioBook लॅपटॉपला टक्कर द्यायला आला स्वस्त किंमतीचा लॅपटॉप, किंमत १५ हजारांपेक्षा कमी

7

नवी दिल्लीः जर तुम्हाला स्वस्त किंमतीचा लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी मार्केटमध्ये एक खास लॅपटॉप लाँच करण्यात आला आहे. मार्केटमध्ये खूपच कमी किंमतीचा नवीन लॅपटॉप Primebook 4G ने एन्ट्री घेतली आहे. या एन्ट्रीमुळे जिओ बुक लॅपटॉपला जोरदार टक्कर देवू शकणार आहे. लेटेस्ट प्राइमबुक 4जी लॅपटॉप मध्ये MediaTek Kompanio 500 प्रोसेसर, 11.6 इंच स्क्रीन आणि अँड्रॉयड 11 सारखे फीचर्स दिले आहेत. हा लॅपटॉप 4G कनेक्टिविटी सोबत येतो.

PrimeBook 4G मध्ये MDM फीचर दिले आहे. हा लॅपटॉप विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आले आहे. हे फीचर सेफ ब्राउजिंग, हिस्ट्री एक्सेस, यूजेस लिमिट आणि पेरेंटल कंट्रोल ऑफर करतो. लॅपटॉप मध्ये यूजर्स गरजेनुसार कस्टमाज्ड की बोर्ड आणि टचपॅड सेटिंग्सला कस्टमाइज करू शकतात.

PrimeBook 4G Laptop Specifications
प्राइमबुक 4G लॅपटॉप मध्ये 11.6 इंच IPS LCD स्क्रीन दिली आहे. जो 1366 x 768 पिक्सल रिजॉलशून ऑफर करते. या बजेट लॅपटॉप मध्ये मीडियाटेक इंटिग्रेटेड ARM माली G72 GPU दिले आहे. कनेक्टिविटीसाठी 4G कार्ड, ब्लूटूथ 5.0, वाय-फाय सारखे फीचर्स मिळते.

लेटेस्ट प्राइमबुक ४ जी मध्ये एक यूएसबी 3.0, मिनी HDMI, मायक्रोएसडी, सिम कार्ड, 3.5 एमएम ऑडियो जॅक, यूएसबी 2.0 आणि चार्जिंग पोर्ट सारखे फीचर्स दिले आहेत. हा लॅपटॉप अँड्रॉयड 11 बेस्ड PrimeOS सोबत येतो. लॅपटॉप मध्ये १० हजारांहून जास्त अँड्रॉयड अॅप्सचे अॅक्सेस मिळते. PrimeBook 4G लॅपटॉप मध्ये ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबी व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. या डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी 4000mAh ची बॅटरी दिली आहे. या लॅपटॉप मध्ये २ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि बिल्ट इन स्पीकर्स दिले आहेत.

वाचाः PAN-Aadhaar Link : ३१ मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक करा, ‘या’ लोकांना सरकारकडून सूट

PrimeBook 4G Price in India
प्राइमबुक 4G अँड्रॉयड लॅपटॉपला स्पेशल किंमती अंतर्गत १४ हजार ९९० रुपयात उपलब्ध करण्यात आले आहे. याशिवाय, नो कॉस्ट ईएमआय ऑफर सुद्धा मिळणार आहे. ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची रेग्युलर किंमत १६ हजार ९९० रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १८ हजार ९९० रुपये आहे. या लॅपटॉपला रॉयल ब्लॅक कलर मध्ये आणले आहे. याला ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart.com वरून ११ मार्च पासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

वाचाः अर्ध्या किंमतीत मिळताहेत ३२ आणि ४३ इंचाचे स्मार्ट टीव्ही, पाहा किंमत-फीचर्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.