Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१० हजारांपर्यंतचे ‘टॉप ५’ पैसा वसूल स्मार्टफोन्स; बॅटरी, कॅमेरा आणि प्रोसेसर जबरदस्त

19

Best top 5 Smartphone 2023 : भारतात प्रत्येक आठवड्यात कोणती ना कोणती कंपनी स्मार्टफोन लाँच करीत असते. देश विदेशातील अनेक कंपन्या भारतात स्मार्टफोन लाँच करीत आहेत. या स्मार्टफोन मध्ये बजेट स्मार्ट फोन पासून प्रीमियम व फ्लॅगशीप स्मार्टफोन्सचा समावेश आहे. तुमचे बजेट जर १० हजार रुपयांपर्यंत असेल तर मार्केटमध्ये टॉप ५ स्मार्टफोन उपलब्ध आहेत. या फोनची किंमत १० हजार रुपये असली तरी फीचर्स मात्र एकदम भारी आहेत. या कंपनी मध्ये रियलमी, रेडमी, पोको, लावा आणि नोकिया सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये चांगला कॅमेरा, मोठी बॅटरी, आणि डिले यूज साठी चांगला परफॉर्मन्सचा प्रोसेसर दिला आहे. तुम्ही जर १० हजार रुपयांच्या बजेट मध्ये चांगला फोन शोधत असाल तर ही माहिती खास तुमच्याासाठी आहे. जाणून घ्या टॉप ५ स्मार्टफोन संबंधी.

Redmi A1+

या फोनची सुरुवातीची किंमत ८ हजार ४४९ रुपये आहे. परंतु, या फोनला ७ हजार ४९९ रुपयाच्या किंमतीत खरेदी करू शकता. या फोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. जो 120Hz टच सँम्पलिंग सोबत येतो. फोन सोबत ड्युअल सिम कार्ड सपोर्ट आणि प्री इंस्टॉल एफएम रेडिओ सुद्धा मिळतो. Redmi A1 Plus मध्ये मीडियाटेक हीलियो A22 प्रोसेसर आणि 3 जीबी पर्यंत LPDDR4X रॅम सोबत ३२ जीबी स्टोरेज सपोर्ट मिळते. फोन सोबत सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. Redmi A1 Plus मध्ये ८ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि फ्रंट मध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आणि 10W चा चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः Cashify चा Holi Sale! iPhone XR, iPhone 11 आणि iPhone 12 ला अर्ध्या किंमतीत खरेदी करा ​

0Realme C33

0realme-c33

रियलमीच्या या फोनची किंमत ८ हजार ९७५ रुपये आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि Unisoc T612 प्रोसेसर दिला आहे. याशिवाय, या फोनमध्ये ४ जीबी पर्यंत रॅम आणि ६४ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. फोनच्या स्टोरेजला मेमरी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येवू शकते. Realme C33 मध्ये दोन रियर कॅमेरे दिले आहे. ज्यात प्रायमरी लेन्स ५० मेगापिक्सलचा आणि दुसरा लेन्स ०.३ मेगापिक्सलचा मिळतो. फोनमध्ये सेल्फी साठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः मेस्सी जैसा कोई नही, स्टाफला गिफ्ट केले ७३ लाखाचे ३५ गोल्ड फोन, काय आहे या फोनमध्ये, पाहा डिटेल्स ​

Moto G31

moto-g31

Moto G31 स्मार्टफोनची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. हा फोन मीडियाटेक प्रोसेसर सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस ओलेड पंच होल डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. १० हजार रुपयांपर्यंत बजेटच्या फोनमध्ये तुम्हाला OLED डिस्प्ले मिळतो. मोटोच्या या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रामयरी लेन्स दिला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः HDFC खातेधारक टार्गेट, SMS मधील लिंक क्लिक करू नका, काय आहे SMS फिशिंग लिंक, जाणून घ्या

Nokia C31

nokia-c31

Nokia C31 स्मार्टफोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. नोकियाच्या या फोनला चारकोल, मिंट आणि सियान कलर ऑप्शन मध्ये खरेदी करता येवू शकते. Nokia C31 मध्ये ६.७ इंचाचा एचडी डिस्प्ले आणि तीन दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ सपोर्ट मिळतो. म्हणजेच मल्टीमीडिया यूजर्ससाठी हा फोन बेस्ट फोन आहे. या फोनमध्ये २.५ कर्व्ड ग्लासचे प्रोटेक्शन मिळते. फोनमध्ये ऑक्टा कोर यूनिसोक प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. फोन अँड्रॉयड १२ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट मिळतो. नोकियाच्या या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनमध्ये ५०५५ एमएएच क्षमतेची बॅटरी मिळते. तसेच १० वॉट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

वाचाः Airtel ला या प्लानमधून Jio चे तगडे आव्हान, महिनाभर वैधता, कॉलिंग आणि डेटाची सुविधा ​

Lava Blaze 5G

lava-blaze-5g

Lava Blaze 5G स्मार्टफोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. भारतात सर्वात कमी किंमतीचा हा ५जी स्मार्टफोन आहे. लावाच्या Lava Blaze 5G फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये असली तरी ऑफर्स सोबत या फोनला १० हजार रुपयांपर्यंत खरेदी करण्याची संधी आहे. लावाच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले आणि ९० हर्ट्जचे रिफ्रेश मिळते. फोन सोबत साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर शिवाय, फेस अनलॉक सुद्धा मिळते. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर आणि ५०० एमएएच क्षमतेची बॅटरी मिळते. याशिवाय या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा आणि अन्य लेन्स एआय दिले आहे. फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वाचाः Airtel ला या प्लानमधून Jio चे तगडे आव्हान, महिनाभर वैधता, कॉलिंग आणि डेटाची सुविधा ​

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.