Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
BSNL 4G ट्रायलची पंजाबपासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार मिळाली आहे. बीएसएनएल त्या २०० साइट्स साठी प्री ऑर्डर करीत आहे. ज्याचा वापर पंजाबमधील तीन जिल्ह्यात ४जी लाँच करण्यासाठी वापर केला जाईल. ज्यात फिरोजपूर, अमृतसर आणि पठाणकोट या तीन जिल्ह्याचा समावेश आहे. ही बीएसएनएलच्या ४जी लाँच करण्याच्या प्रोजेक्टचा एक भाग आहे. परंतु, टीसीएससाठी अंतिम निविडा सरकारद्वारा अनुमोदित करणे अजून बाकी आहे. सरकारकडून टीसीएसला एक लाख ४जी साइट्स साठी संपूर्ण टेंडर देण्याची स्विकृती मार्चच्या अखेरपर्यंत मिळू शकते.
एप्रिल २०२३ मध्ये होवू शकते लाँचिंग
टीसीएसच्या मालकीचे तेजस नेटवर्कने आधीच जवळपास ५० साइट्ससाठी उपकरणांची पूर्तता केली आहे. यासाठी सी-डॉट एक सॉफ्टवेयर पॅच अपग्रेड तैनात केली जावू शकते. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मार्चच्या मध्यात ४जी लाँचिंग साठी जवळपास १०० साइट्स पूर्ण करण्याची शक्यता आहे. जर सर्वकाही योजनेनुसार, झाले तर बीएसएनएलची ४जी कमर्शियल सर्विस एप्रिल २०२३ मध्ये होणार आहे.
वाचाः Holi 2023: होळीत रंगाची उधळण करताना स्मार्टफोन, स्मार्टवॉच खराब झालीय?
4G ने २० टक्के वाढणार बीएसएनएलची मिळकत
दूरसंचार विभाग (DoT) ला मार्चच्या सुरुवातीपर्यंत सरकारकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यानंतर टीसीएसला १ लाख हून जास्त साइट्ससाठी ४जी इक्विपमेंटसाठी ऑर्डर जारी केले जावू शकते. बीएसएनएलला अपेक्षा आहे की, ४जी सर्विस भारतात लाँचिंग केल्यानंतर कंपनीच्या मिळकतीत २० टक्के वाढ होईल.
वाचाः एकदा रिचार्ज करा अन् २५२ दिवस टेन्शन फ्री राहा, जिओच्या या प्लानपुढे Airtel-Vi पडले मागे