Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अमेरिकन कंपनीचे ५५ इंचापर्यंतचे तीन टीव्ही भारतात लाँच, किंमत ६९९९ रुपयांपासून सुरू

5

नवी दिल्लीः भारतीय मार्केटमध्ये होळी निमित्त Westinghouse कंपनीने काही मॉडल्स लाँच केले आहेत. कंपनीने Quantum सीरीज आणि Pi सीरीजचे मॉडल्स लाँच केले आहेत. याला एक्सक्लूसिवली Amazon वर उपलब्ध करण्यात आले आहे. या टीव्हीची सुरुवातीची किंमत ६ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. Pi सीरीज अंतर्गत २४ इंच आणि ४० इंचाचे मॉडल्स लाँच केले आहेत. हे लिनक्स प्लॅटफॉर्मवर काम करतात. तर Quantum सीरीज अंतर्गत ५५ इंचाचे मॉडल लाँच केले आहेत. हे अँड्रॉयड वर काम करतात.

२४ इंचाच्या मॉडलमध्ये एचडी रेडी स्क्रीन दिली आहे. याचा पिक्सल रिझॉल्यूशन 1366 x 768 आहे. याची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. तर या सीरीज अंतर्गत ४० इंचाच्या फुल एचडी डिस्प्ले मॉडलची किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे. तर ५० इंचाच्या 4k Ultra HD टीव्हीची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. २४ इंच मॉडल आणि ४० इंच मॉडल ५१२ एमबी रॅम सोबत येतो. सोबत ४ जीबी स्टोरेज दिले आहे. यात २ एचडीएमआय पोर्ट आणि २ यूएसबी पोर्ट दिले आहे. यात बॉटम फायरिंग टाइप २ स्पीकर्स दिले आहे. सोबत २४ इंचाच्या टीव्हीत २० वॉटचे स्पीकर्स दिले आहेत. ४० इंचाच्या टीव्हीत ३० वॉटचे स्पीकर्स दिले आहेत. हे Coaxial टेक्नोलॉजीच्या डिजिटल ऑडियो आउटपूटला सपोर्ट करते.

वाचाः एकदा रिचार्ज करा अन् २५२ दिवस टेन्शन फ्री राहा, जिओच्या या प्लानपुढे Airtel-Vi पडले मागे

या मॉडल्समध्ये डिजिटल नॉइस फिल्टर दिले आहे. सोबत A35*4 प्रोसेसर सोबत A+ पॅनेल दिले आहे. हा स्मार्ट एचडी रेडी टीव्ही दिले आहे. यात गुगल प्ले स्टोरचे सपोर्ट दिले आहे. यात यूजर्सला YouTube, Prime Video, Sony Liv आणि Zee5 चे सपोर्ट दिले आहे. Quantum सीरीज अंतर्गत ५५ इंचाचे टीव्ही येतात. यात DLED स्क्रीन दिली आहे. जी 4K Ultra HD (3840×2160) पॅनेल सोबत येते. यात होम स्क्रीन डिजिटल नॉइस फिल्टर दिले आहे. सोबत A35*4 प्रोसेसर आणि IPS पॅनेल दिले आहे. या टीव्हीत 2GB रॅम आणि ८ जीबी स्टोरेज दिले आहे. यात 3 HDMI कनेक्टर आणि 2 USB पोर्ट्स दिले आहेत.

वाचाः एकदाचं ठरलं! BSNL 4G सेवा लवकरच येतेय, जाणून घ्या डिटेल्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.