Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

2GB डेटा प्लानमध्ये हा प्लान आहे सर्वात बेस्ट, कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग, SMS आणि अन्य बेनिफिट्स

7

नवी दिल्लीः जर तुम्हाला डेली डेटा लिमिट जास्त हवी असेल तर तुम्ही अशा प्लानची निवड करणे गरजेची आहे. ज्यात रोज २ जीबी डेटा मिळतो. या किंमतीत अनेक सर्व प्रीपेड रिचार्ज प्लान उपलब्ध आहे. यात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया प्लानचे नाव समोर येते. परंतु, आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी या तिन्ही कंपनीचे बेस्ट प्लान संबंधी माहिती देत आहोत. ज्यात तुम्ही कमी किंमतीत बेस्ट प्लानची निवड करू शकतात.

एअरटेलचा ३५९ रुपयाचा रिचार्ज प्लान

या प्लानमध्ये डेली २ जीबी डेटा आणि १०० SMS मिळतात. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS ची सुविधा मिळते. हा प्लान १ महिन्याच्या वैधते सोबत येतो. सोबत २८ दिवसासाठी एक्सट्रिम अॅपचे फ्री अॅक्सेस दिले जाते. फास्टॅगच्या खरेदीवर १०० रुपयाचा कॅशबॅक सुद्धा दिला जातो.

वोडाफोन आयडियाचा ३१९ रुपयाचा प्लान
वोडाफोन आयडियाच्या नवीन रिचार्ज प्लानमध्ये डेली २ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत विकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा दिली जाते. सोबत डेली १०० SMS दिले जाते. हा प्लान ३१ दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्लानमध्ये अन्य काही सुविधा दिल्या जातात.

एअरटेलचा ३१९ रुपयाचा प्लान
हा प्लान ३१९ रुपये किंमतीत येतो. या प्लानमध्ये डेली २ जीबी डेटा दिला जातो. अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय, डेली १०० SMS फ्री मिळते. हा प्लान फास्टॅगच्या खरेदीवर १०० रुपयाचा कॅशबॅक आणि विंक म्यूझिकचे सब्सक्रिप्शन सुद्धा देते.

वाचाः Solar AC: २४ तास चालेल एअर कंडिशनर, तरीही येणार नाही वीज बिल

जिओचा २९९ रुपयाचा प्लान
या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. यात डेली २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. सोबत या प्लानमध्ये डेली १०० SMS फ्री दिले जाते. या प्लानमध्ये JioTV, JioCinema सब्सक्रिप्शन दिले जाते.

जिओचा २४९ रुपयाचा प्लान
हा प्रीपेड प्लान डेली २ जीबी डेटा सोबत येतो. यात अनलिमिटेड कॉलिंग मिळते. सोबत डेली १०० एसएमएस दिले जाते. प्लान २३ दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्लानध्ये Jio Suite अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री अॅक्सेस मिळते.

वाचाः Disney+ Hotstar यूजर्ससाठी ‘बॅड न्यूज’; १ एप्रिलपासून ही सुविधा होणार बंद

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.