Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Xiaomi 13 Pro ची किंमत
या फोनच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७९ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन भारतातील आतापर्यंतचा शाओमीचा सर्वात महागडा फोन आहे. ऑफर्स मध्ये ICICI बँक कार्ड सोबत १० हजार रुपयाचा इंस्टेंट सूट दिली जात आहे. यानंतर या फोनची किंमत ६९ हजार ९९९ रुपये आहे. तर नॉन शाओमी आणि रेडमी डिव्हाइस सोबत ८ हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. जर तुमच्याकडे रेडमी किंवा शाओमी फोन असेल तर तुम्ही या किंमतीत १२ हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस मिळवू शकता. या फोनला सिरेमिक व्हाइट, सिरेमिक ब्लॅक कलर मध्ये खरेदी करू शकता.
वाचाः iPhone 14 मिळतोय फक्त ५२ हजार ९०० रुपयात, आता नाही खरेदी करणार तर कधी?
Xiaomi 13 Pro चे फीचर्स
या फोनमध्ये ६.७ इंचाचा 2K कर्व्ड डिस्प्ले दिला आहे. सोबत १२० हर्ट्जचा रिफ्रेश रेट दिला आहे. फोनमध्ये एचडीआर10+ सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ झेन २ एसओसी उपलब्ध आहे. सोबत १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचे तीन कॅमेरे, वाइड, अल्ट्रा वाइड टेलिफोटो दिले आहेत. तसेच या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Xiaomi 13 Pro मध्ये 120W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टद्वारे 4820mAh ची बॅटरी दिली आहे. सोबत Android 13 वर आधारित MIUI 14 दिले आहे.
वाचाः जिओची साताऱ्यासह आणखी २७ शहरात 5G सर्विस सुरू, पाहा संपूर्ण शहराची लिस्ट