Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Neelam Gorhe Criticizes Modi Govt: केंद्राच्या व्हॅक्सिन डिप्लोमसीचा राज्यांना फटका; डॉ.नीलम गोऱ्हे यांचा मोदी सरकारवर निशाणा

19

हायलाइट्स:

  • विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची केंद्र सरकारवर टीका.
  • केंद्र शासनाने व्हॅक्सिन डिप्लोमसी करायची गरज नव्हती- डॉ. नीलम गोऱ्हे.
  • केंद्राच्या या धरसोड वृत्तीचा राज्य सरकारांना फटका बसला-डॉ. नीलम गोऱ्हे.

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

‘केंद्र शासनाने व्हॅक्सिन डिप्लोमसी करायची गरज नव्हती. सुरुवातीलाच जर सर्वांसाठी लसीकरणाला सुरुवात झाली असती, तर दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची संख्या देखील कमी करता आली असती. केंद्राच्या या धरसोड वृत्तीचा राज्य सरकारांना फटका बसला’, अशा शब्दात शिवसेनेच्या उपनेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज जळगावात केंद्र सरकारवर निशाणा साधला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात ही भेट शिष्टाचाराचा भाग असल्याचे सांगीतले जात असले तरी राजकारणात काहीही अशक्य नसल्याचे सूचक मत त्यांनी व्यक्त केले. (dr neelam gorhe criticizes the central government for its vaccine diplomacy)

शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी विविध शासकीय विभागांसोबत आढावा बैठका घेतल्या. त्यानंतर पक्ष संघटनेचा आढावा देखील जाणून घेतला. यानंतर अजिंठा शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत व शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे देखील उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डा. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, जळगाव जिल्हातील तालुके व जिल्हा करोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. जळगाव जिल्ह्यात झालेल्या या उपाययोजनांचा जळगाव पॅटर्न इतर जिल्ह्यात देखील वापरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- पन्हाळ्यात भीषण अपघात; कार थेट दरीत कोसळली, दोन युवक ठार

संथ लसीकरणावरुन केंद्रावर निशाणा

संपूर्ण देशभरात १६ जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली, तत्पूर्वी केंद्र सरकारने परदेशात लस वितरित करायला नको होती. जगातील इतर देश आधी आपल्या देशातील नागरिकांना लस देत असताना आपल्या केंद्र सरकारने मात्र, सुरुवातीला व्हॅक्सिन डिप्लोमसीतून देशातील नागरिकांऐवजी परदेशात लस दिली. त्याचा फटका आज आपल्याला बसतोय. केंद्र सरकारने एकत्र टेंडर न काढता सुरुवातील राज्यांना व्हॅक्सिनसाठी टेंडर काढण्यास सांगीतले. केंद्राच्या अश्या धरसोड वृत्तीमळे लसीकरणाची गती संथ व्हायला हेच प्रमुख कारण असल्याचा आरोपही नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केला.

क्लिक करा आणि वाचा- पंतप्रधान मोदी आणि अमित शहांविरुद्धची ‘ती’ याचिका खारिज

भाजप- मनसे युती झाल्यास त्यांच्या कार्यकर्त्यांचे अवघड

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरेंमध्ये झालेल्या भेटीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते आपापल्या पक्षांचे प्रमुख आहेत. दोन स्वतंत्र पक्षांच्या प्रमुखांची भेट होणे हा राज शिष्टाचाराचा भाग असल्याचे या दोन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. परंतु, राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. तसेच राजकारणात कुठलीही गोष्ट अशक्य देखील नसते. शेवटी दोघांच्या भेटीबाबत एकच सांगते की, या भेटीने राजकीय उत्सुकतेची कहाणी सुरू झाली आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. या पक्षांच्या दोन्ही नेत्यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व पाहिले तर कार्यकर्त्यांचे अवघड दिसतेय, अशा शब्दांत नीलम गोऱ्हे यांनी चिमटा देखील काढला.

क्लिक करा आणि वाचा- हॉटेलच्या वेळा वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले…

आघाडी सरकारमधील पक्षांकडून मुख्यमंत्र्यांना सन्मान

शिवसेना- भाजपा युती पुन्हा होवून शकते का? या प्रश्नावर बोलतांना डॉ. गोऱ्हे यांनी सांगीतले की, ज्या मुद्द्यावरुन आमच्या मतभेद झालेत त्याचा विचार केला तर आमचा विश्वासघात झाल्याची खात्री झाल्यावरच आम्ही इतर पक्षांसोबत गेलो. महाआघाडी सरकारमधील दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सन्मान मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

सोम्या- गोम्या सोडून गेल्यावरही शिवसेना उभी

जळगाव जिल्हात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी चांगली झाली आहे. जळगाव महापालिका शिवसेनेकडे आल्याने पक्षात चैतन्य आले आहे. आज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून पक्षाचा आढावा घेतला. लवकरच शिवसेना संपर्क मोहीम राबविणार आहे. सध्या आंदोलनाचे माध्यम देखील बदलले असून प्रश्नांचा पाठपुरावा करुन जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे आमचा कल असल्याचेही गोऱ्हे म्हणाल्यात. शिवसेनेतून अनेक सोम्या- गोम्या सोडून गेलेत तरी शिवसेना भक्कम असून फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतली असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.