Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ठरलं! Nothing Phone (2) लवकरच भारतात लाँच होणार, पाहा संभावित फीचर्स

8

नवी दिल्लीः Nothing Phone (1) स्मार्टफोनची लाँचिंगच्या आधीपासून जोरदार चर्चा झाली होती. फोनची जबरदस्त डिझाइन असल्याने अनेक ग्राहकांना हा फोन खास वाटला. आता नथिंग कंपनी आपला दुसरा स्मार्टफोन Nothing Phone (2) आणण्याची तयारी करीत आहे. कंपनी यासंबंधी कन्फर्मेशन दिले आहे. Upcoming Smartphone मिड रेंज पेक्षा थोडा वर असणार आहे. Nothing Phone (2) ला लाँचिंग आधी BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर पाहिले गेले आहे. याचे मॉडल नंबंर नथिंग AIN065 आहे. यावरून उघड आहे की, नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच केला जावू शकतो. सोबत या फोनची काही डिटेल्स सुद्धा समोर आली आहे. ट्विटरवर टिप्स्टर सुधांशूने या पोनची डिटेल्स शेअर केली आहेत. जाणून घ्या या फोनसंबंधी.

Nothing Phone (2) चा डिस्प्ले
Nothing Phone (2) मध्ये FHD+ रिझॉल्यूशन सोबत AMOLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. हा 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. डिझाइनमध्ये हा स्मार्टफोन सुद्धा बॅक साइडमध्ये Glyph लाइटिंग सोबत येवू शकतो.

Nothing Phone (2) चा कॅमेरा
या स्मार्टफोन मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा सोबत ड्युअल कॅमेरा-सेटअप दिला जावू शकतो. जो OIS सपोर्ट सोबत येईल. तर फ्रंट साइड मध्ये फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जावू शकतो.

Nothing Phone (2) ची परफॉर्मेंस

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, Nothing Phone (2) ला Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर सोबत आणले जावू शकते. या स्मार्टफोन सोबत 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये Android 13 वर बेस्ड नथिंग ऑपरेटिंग सिस्टम मिळू शकते.

वाचाः Airtel च्या एका रिचार्जमध्ये मिळणार संपूर्ण फॅमिलीला बेनिफिट्स, १९० जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Nothing Phone (2) ची बॅटरी
नवीन Nothing स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जावू शकते. हा फोन फास्ट चार्जिंग आणि वायरलेस फास्ट चार्जिंग दोन्हीला सपोर्ट करेल. अद्याप या फोनसंबंधी जास्त माहिती समोर आली नाही.

वाचाः PAN Aadhaar Linking Status : पॅन-आधार कार्ड लिंकची डेडलाइन, घरी बसून ‘असं’ चेक करा स्टेट्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.