Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बिल्डरकडे 3 कोटींच्या खंडणीची मागणी करणारे आरोपी पुणे शहर गुन्हे शाखा 3 च्या जाळ्यात

6

पुणे,दि.२७ :- पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाकडे 3 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला असून या प्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइलचा वापर केला आहे. तर युवा मोर्चाच्या कार्यक्रमाचे आयोजन असल्याचे सांगून आरोपींनी पैसे मगितल्याचे समजते. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला बोगस फोन असल्याचा संशय आला. याबाबत बांधकाम व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
नावाचा वापर करुन खंडणी मागितली: याबाबत पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील पौड रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाचे एक कार्यालय आहे. या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी आरोपी पाटील आणि ताकवणे यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइलवर संपर्क केला. यावेळी त्यांनी मुरलीधर मोहोळ आणि त्यांचे मित्र असल्याचे नावाचा वापर केला. तसेच बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. हा प्रकार बांधकाम व्यवसायिकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधला.व्यवसायिकाला दिली होती धमकी : आरोपींकडून धमकी देण्यात आली आहे.व पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहोचवू, अशी धमकी आरोपी पाटील आणि ताकवणे यांनी बांधकाम व्यवसायिकाला दिली होती. या धमकीमध्ये आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात खंडणी धमकावणे माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व मुरलीधर मोहोळ यांनी तात्काळ माहिती पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक यांना कळविले.व मुरलीधर मोहोळ व त्यांचे मित्र यांनी सायबर पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे तक्रार दिली. पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक यांनी तात्काळ कारवाई करणेबाबत पोलिस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे यांना सुचना दिल्या त्याप्रमाणे युनिट-३ कडून पोलीस अधिकारी व अंमलदार यांना खंडणी मागणा-या इसमास पकडणेसाठी तक्रारदार यांचे कार्यालयात सापळा लावण्यात आला.
त्यानंतर तक्रारदार यांनी फोनवरून १० लाख रूपये देण्याचे मान्य करून खंडणी मागणा-या इसमास तुम्ही येवून कार्यालयातून पैसे घेवून जाण्यास सांगीतले. खंडणी मागणाऱ्या इसमाने स्वतः न येता त्याच्या ओळखीचा इसम नामे शेखर गजानन ताकावणे वय ३५ वर्षे रा. भालेकर चाळ, कर्वे रोड, पुणे यांस तक्रारदार यांचे कार्यालयात पाठविले त्यावेळी सदर इसम हा पैसे घेत असताना युनिट- ३ च्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्याला ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी करता मुख्य खंडणी मागणा-या इसमाने त्यास पैसे घेवून स्वारगेट चौकात येण्यास मोबाईलवरून कळविले. त्याप्रमाणे दुसरा सापळा युनिट ३ कडून लावणेकामी स्वारगेट चौक येथे नमुद इसमास घेवून पोलीस पोहोचले असता मुख्य आरोपी हा कात्रज चौक निसर्ग हॉटेल, सनसेट पॉईट, जूना बोगदा असे वेळोवेळी फोन करून जागा बदलत होता. त्यांनतर मुख्य आरोपी याने नमुद इसमास कात्रज जुना बोगदा येथे पैसे घेवून येण्यास सांगीतले त्यांनतर मुख्य आरोपी यास पोलीसांची चाहुल लागल्यामुळे तो त्याचे कारसह पळुन जात असताना पोलीसांनी त्याचे ताब्यातील कारसह त्यास पळून जात असताना पकडले आहे त्याचेकडे चौकशी करता मुख्य खंडणी मागणाऱ्या आरोपीने त्याचे नाव संदीप पीरगोंडा पाटील वय ३३ वर्षे रा. मु.पो. बेकनार ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर असे असल्याचे सांगीतले त्याने सदरचा गुन्हा कबुल करुन इंटरनेटव्दारे मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याचा (स्पूफिंग कॉल सायबर क्राईम ) वापर करुन त्यांच्याच बांधकाम व्यावसायीक मित्राकडून खंडणी मागण्याचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने कोथरूड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपी कोथरूड पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहेत.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे १ सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस उप-निरीक्षक अजितकुमार पाटील, सहा. पोलिस उप-निरीक्षक संतोष क्षीरसागर पोलिस अंमलदार शरद वाकसे, संजीव कळंबे, प्रताप पडवाळ, प्रकाश कट्टे, ज्ञानेश्वर चित्ते, विकास चौगुले, सावंत यांचे पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.