Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये आठवड्यात २ हत्तींचा मृत्यू
- वन्यजीव प्रेमींमध्ये संताप, मृत्यूचे गूढ कायम
- दुसऱ्या हत्तीचे शवविच्छेदन अजूनही नाही
३ ऑगस्ट रोजी ‘सई’ नावाच्या हत्तिणीचा मृत्यू झाला होता. या मृत्यूचे गूढ कायम असतानाच आज ६ ऑगस्ट रोजी ‘अर्जुन’ नावाच्या हत्तीचा मृत्यू झाल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती घेण्यासाठी गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ किशोर मानकर हे आपल्या चमुसोबत कमलापूर हत्ती कॅम्प गाठले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा चमू काल वेळेवर पोहोचू न शकल्यानं शवविच्छेदन होऊ शकले नाही.
वाचा: ‘अनिल देशमुख विदेशात तर पळून गेले नाही ना?’
डॉ. किशोर मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खड्ड्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू वेळेवर पोहोचू शकली नाही. अंधारात शवविच्छेदन करणे शक्य नाही. गोलकर्जी ते रेपणपल्ली दरम्यान खूप मोठे खड्डे असल्याने वाहन फसली. त्यामुळे आम्हलाच राजाराम खांदला मार्गाचा अवलंब करावा लागला आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी शवविच्छेदन होणार असल्याची माहिती गडचिरोलीचे वन संवरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी दिली आहे.
गडचिरोलीतल्या हत्ती कॅम्प मध्ये एका आठवड्यात दोन हत्ती मृत्यूमुखी
नागपूरवरून आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक कमलापूर गाठणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच तर शवविच्छेदन थांबविले नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काहीही असले तरी एकाच आठवड्यात दोन हत्तींच्या मृत्यूमुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मृत्यूचे कारण कळल्यावरच योग्य निर्णय
सिरोंचा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्पमध्ये हत्तीचा मृत्यू होण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही. ते कळल्यावरच योग्य निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी मटा ऑनलाइनशी बोलताना दिली.
वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ फोटोची राज्यभर चर्चा