Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jio-VI आणि Airtel चे हे प्लान IPL साठी बेस्ट, डेली डेटाची कोणतीही लिमिट नाही

5

नवी दिल्लीःBest Recharge Plan for IPL: ३१ मार्च पासून आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. यावेळी आयपीएलचे प्रसारण जिओ सिनेमा अॅपवरून केले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉपवरून पाहू शकता. जर तुम्हाला आयपीएलसाठी बेस्ट रिचार्ज प्लान हवा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाण काही खास रिचार्ज प्लानची माहिती देत आहोत. या ठिकाणी तीन प्रमुख टेलिकॉम ऑपरेटर वोडाफोन, जिओ आणि एअरटेलच्या प्लान संबंधी माहिती देत आहोत. या प्लानची किंमत ३०० रुपयांपेक्षा कमी आहे.

रिलायन्स जिओचा २६९ रुपयाचा प्लान
हा रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त मंथली प्लान आहे. ज्यात डेली डेटाची कोणतीही लिमिट नाही. हा प्लान ३० दिवसाच्या वैधते सोबत येतो. ज्यात तुम्हाला रोज १०० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि २५ जीबी डेटा मिळू शकतो.

वाचाः Airtel 5G : जे जिओला जमलं नाही ते एअरटेलनं करून दाखवलं

एअरटेलचा २६९ रुपयाचा प्लान
एअरटेलचा २६९ रुपयाचा प्रीपेड प्लानमध्ये कंपनी ३० दिवसाची वैधता देते. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि २५ जीबी डेटा मिळतो. तुमच्या परिसरात ५जी नेटवर्क असेल तर तुम्ही ५जी नेटवर्क सुद्धा यूज करू शकता. तसेच या प्लानमध्ये ‘फ्री अनलिमिटेड 5G’ ऑफरचा लाभ मिळू शकतो. ही ऑफर जिओप्रमाणे एअरटेलने सुरू केली आहे. ज्यात कंपनी फ्री मध्ये ५जी डेटा वापरू देते.

वाचाः 5G स्मार्टफोन कसा असावा?, फक्त या १० पॉइंट्समधून समजून घ्या

वोडाफोन आयडियाचा २९६ रुपयाचा प्लान

वोडाफोन आयडिया आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी २९६ रुपयाच्या प्लानमध्ये १०० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि २५ जीबी डेटा ३० दिवसासाठी देत आहे. जर कोणत्याही कारणाने तुमचा डेटा पॅक लवकरच संपत असेल तर तुम्ही याला डेटा रोलओव्हर प्लस प्लान घेवू शकता.

वाचाः जिओचा १९८ रुपयाचा प्लान लाँच, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, डेटा आणि १४ OTT Apps

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.