Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शाओमीच्या या स्मार्टफोन्ससाठी आले MIUI 14 अपडेट, Apple आणि सॅमसंगसारखे फीचर्स मिळणार

7

नवी दिल्लीःMIUI 14 Update: शाओमीने नुकतेच अँड्रॉयड १३ बेस्ड एमआययूआय १४ अपडेट Xiaomi 13 Pro मध्ये दिले होते. आगामी काळात हे अपडेट शाओमीच्या दुसऱ्या फोनमध्ये म्हणजेच रेडमी आणि पोकोच्या स्मार्टफोनमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. ज्या स्मार्टफोनमध्ये हे अपडेट लवकर मिळणार आहे. त्यात Xiaomi 12 Pro, Mi 11 Ultra, Mi 11X Pro 5G, Mi 11T Pro, Redmi Note 12 Pro+ 5G, Mi 11X, Redmi Note 12 Pro 5G, Redmi K50i 5G, Xiaomi 11 Lite NE 5G आणि Redmi 11 Prime 5G या फोनचा समावेश आहे.

MIUI 14 मध्ये मिळतात हे खास फीचर्स
MIUI 14 मध्ये यूजर्सला एंलार्ज फोल्डरची सुविधा मिळते. म्हणजेच तुम्ही फोल्डर साइज मोठी करू शकता. आतापर्यंत होम स्क्रीनवर तुम्ही फोल्डरला डिलिट करू शकत होता किंवा ओपन करू शकत होता. परंतु, आता नवीन अपडेट मध्ये तुम्हाला फोल्डर साइजला वाढवण्याचा ऑप्शन सुद्धा मिळणार आहे. MIUI 14 अपडेट मध्ये मोबाइल फोनमध्ये आधीपासून इंस्टॉल अपला डिलीट करता येवू शकते. अँड्रॉयड १३ बेस्ड MIUI 14 मध्ये पॉकेट मोड दिले आहे. परंतु, ज्यावेळी स्मार्टफोन खिशात असेल तर डॅमेज मिळणार नाही. याशिवाय, MIUI 14 मध्ये ६ नवीन वॉलपेपर दिले आहे. सोबत कंपनीने सेटिंग मेन्यूला आधीपेक्षा जास्त क्लीन आणि ऑर्गेनाइज बनवले आहे.

वाचाः २७ हजाराचा Airpods Pro खरेदी करा फक्त १० हजार रुपयात, ही वेबसाइट देतेय बंपर डिस्काउंट

शाओमीचे नवीन अपडेट MIUI 14 मध्ये तुम्ही फोटोने टेक्स्ट कॉपी करू शकता. हे फीचर आधीच सॅमसंग, अॅपल आणि गुगलच्या फोनमध्ये उपलब्ध आहे. नवीन अपडेट अंतर्गत तुम्ही कोणत्याही फोटोवर वॉटर मार्क अॅड करू शकता. याशिवाय, कोणत्याही इमेज वरून ऑब्जेक्ट, शॅडो किंवा पिक्चर हटवू शकता. ज्याप्रमाणे IOS 16 मध्ये कट आउट फीचर मिळते. त्यासारखे फीचर शाओमीच्या या नवीन अपडेट सोबत दिले आहे. तुम्ही फोटोला बॅकग्राउंडमधून वेगळे करू शकता. नवीन अपडेट मध्ये तुम्हाला ड्युअल फ्लोटिंग विंडो, व्हिडिओ क्वॉलिटीला कंप्रेस आणि व्हिडिओला एडिट करण्यासाठी प्रो मोड दिले आहे.

वाचाः नवीन SIM Card Rules लागू, जाणून घ्या अन्यथा २ वर्षासाठी मोबाइल नंबर होईल ब्लॉक

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.