Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सोशल मीडियावर या ॲपची वर्किंग पाहून व्हिडिओ शेअर केला जात आहे. ज्यात Ogler EyeScan ॲपने आर्कस, मेलेनोमा, टेलिजियम आणि मोतीबिंदूची माहिती कळू शकणार आहे. लीनाने दावा केला आहे की, हे ॲप अडवॉन्स्ड कम्प्यूटर आणि मशीन लर्निंग अल्गोरिदमच्या मदतीने लाइट आणि कलर इंटेंसिटी, डिस्टेंस, फ्रेम रेंजच्या आत लूक अप पॉइंट्स द्वारे माहिती करण्यात सक्षम आहे.
वाचाः iPhone 14 Pro Max ला अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, Flipkart ऐवजी या ठिकाणाहून खरेदी करा
लीनाने सांगितले की, हे ॲप पूर्ण पणे स्वदेशी आहे. यात SwiftUI द्वारे बनवले आहे. या ॲपला बनवण्यासाठी डोळ्याची कंडिशन्स, कंम्प्यूटर व्हिजन, अल्गोरिदम, मशीन लर्निंग मॉडल्स, अॅपलचे अडवॉन्स्ड iOS डेवलपमेंट्स जसे, सेन्सर डेटा , AR, CreateML, CoreML विषया संबंधी ६ महिन्यांपर्यंत याची माहिती जमवली व नंतर त्यात संशोधन केले आहे, असे लीनाने सांगितले आहे. लीनाची मोठी बहीण हाना, सोशल मीडियावर अवघ्या ९ व्या वर्षी एक स्टोरी टेलिंग ॲप बनवून सर्वात तरुण iOS डेवलपर साठी व्हायरल झाली होती.
वाचाः नवीन SIM Card Rules लागू, जाणून घ्या अन्यथा २ वर्षासाठी मोबाइल नंबर होईल ब्लॉक
अनेकांकडून अभिनंदन
लीना रफिकने आयफोनचा वापर करून एक जबरदस्त स्कॅनिंग ॲप तयार केले आहे. यामुळे डोळ्याच्या आजाराची माहिती समजू शकणार आहे. अनेक यूजर्संनी या नवीन कामगिरीसाठी लीनाचे अभिनंदन केले आहे. कमी वयात अशी कामगिरी केल्याने लीनाचे सगळीकडे कौतुक होत आहे.
वाचाः शाओमीच्या या स्मार्टफोन्ससाठी आले MIUI 14 अपडेट, Apple आणि सॅमसंगसारखे फीचर्स मिळणार