Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Parineeti Chopra Education: परिणीती चोप्रा शिक्षणाच्या बाबतीत सर्वांच्या पुढे, तुम्हाला ऐकून वाटेल आश्चर्य

6

Parineeti Chopra Education Details: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्डा यांचे लग्न होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. परिणीती चोप्रा ही बॉलिवूड अभिनेत्री असून ती अनेक आघाडीच्या अभिनेत्रींपेक्षा जास्त शिकली आहे. तिच्या शिक्षण आणि करिअरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

परिणीती चोप्राचा जन्म २२ ऑक्टोबर १९८८ रोजी अंबाला, हरियाणा येथे झाला. तिचे वडील पवन चोप्रा हे व्यापारी आहेत आणि आई रीना चोप्रा गृहिणी आहे. तिला शिवांग आणि सहज चोप्रा असे दोन लहान भाऊ आहेत. परिणीती ही अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण आहे.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिची गणना इंडस्ट्रीतील सर्वात शिक्षित अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिने आपले शालेय शिक्षण अंबाला येथील कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर तिने पुढील शिक्षण इंग्लंडमधील मँचेस्टर येथील मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून पूर्ण केले. बिझनेस, फायनान्स आणि इकोनॉमिक्स या विषयात ऑनर्स पदवी घेतली आहे.

परिणीती चोप्राने २०११ मध्ये ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१७ मध्ये तिने ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटातील ‘मन की हम यार नहीं’ या गाण्यातही आपला आवाज दिला होता. परिणिती अभ्यासात खूप हुशार होती. तिला इन्व्हेस्टमेंट बँकर व्हायचे होते. बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा विचारही तिने केला नव्हता. पण तिच्या नशीबात काही वेगळंच लिहिलं होतं.

परिणीती चोप्राने प्रसिद्ध फुटबॉल क्लब युनायटेड मँचेस्टर क्लबमध्ये कॅटरिंग टीम लीडर म्हणून काम केले आहे. २००८ च्या आर्थिक मंदीमुळे तिला लंडनमध्ये नोकरी मिळू शकली नाही. यानंतर ती भारतात परतली आणि नंतर यशराज फिल्म्समध्ये पब्लीक रिलेशन्स म्हणून काम करू लागली.

अभिनय आणि नृत्यासोबतच परिणीती चोप्रा गाण्यातही प्रवीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीतीने म्युझिकमध्ये बीए ऑनर्स केले आहे. ती एक प्रशिक्षित गायिका आहे. तिला गॅजेट्स आणि ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. २०१६ मध्ये परिणिती चोप्राला वजन कमी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.