Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
UPI Merchant Transaction वर Prepaid Payment Instrument (PPI) लावला जाणार आहे. जर कोणतीही व्यक्ती Mobile Wallet च्या मदतीने कोणत्याही व्यापाऱ्याला Payment Transfer करीत असेल तर त्या बदल्यात Interchange Fees लागू होणार आहे. ही फी Merchant कडून घेतली जाणार आहे. म्हणजेचे १.१ टक्क्यांपर्यंत Extra Interchange Fees घेतली जाणार आहे. इंटरचेंज फी व्यापारी, मोठे व्यापारी आणि छोटे ऑफलाइन व्यापाऱ्यांना द्यावी लागणार आहे.
वाचाः IPL 2023: हॉटस्टारची गरज नाही, या ठिकाणी ऑनलाइन पाहू शकता IPL सामने
Extra Charges on Payment
PPI च्या अंतर्गत Card आणि Wallet चा समावेश आहे. या दोन्हींना मोड्सच्या मदतीने पेमेंट केल्यानंतर तुम्हाला फी द्यावी लागणार आहे. खरं म्हणजे ज्यावेळी तुम्ही कार्डवरून पेमेंट करता त्यावेळी दुकानदार तुमच्याकडे एक्स्ट्रा चार्जची डिमांड करीत असतो. परंतु, हे शुल्क नवीन नाही. हे आधीपासूनच लागू होत आहे.
वाचाः iPhone 14 ला अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, ४५ हजारांची बंपर सूट
Wallet Charges
NPCI च्या सर्क्युलर मध्ये माहिती दिली आहे की, बँक अकाउंट आणि PPI Wallet यांच्या दरम्यान पीयर-टू-पीयर (P2P) आणि पीयर-टू-पीयर-मर्चेंट (P2PM) मध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शनवर वेगळ्या पद्धतीची फी लावली जात नाही. म्हणजेच तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. UPI Payment Normal User साठी अजूनही पूर्णपणे फ्री असणार आहे. नुकतीच यासंबंधी एक बातमी व्हायरल झाली होती. परंतु, यावर NPCI कडून स्पष्टीकरण देण्यात आले असून यावर कोणताही नवीन चार्ज लावला जात नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाचाः Airtel च्या 5G डेटाचा रिचार्ज प्लान, फ्री मध्ये मिळणार Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन