Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus 10R 5G च्या किंमतीत दुसऱ्यांदा कपात, फोन ७ हजारांनी स्वस्त, पाहा नवी किंमत

32

नवी दिल्लीः हँडसेट निर्माता कंपनी वनप्लस ४ एप्रिल रोजी नॉर्ड सीरीज अंतर्गत लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus Nord CE 3 Lite ला लाँच करणार आहे. या सीरीज अंतर्गत लेटेस्ट फोनच्या लाँचिंग आधीच गेल्या वर्षी लाँच झालेला OnePlus 10R च्या किंमतीत दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे. यावेळी फोनच्या किंमतीत ३ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे.

OnePlus 10R ची किंमत
वनप्लस 10आर च्या 8GB+128GB व्हेरियंटला ३८ हजार ९९९ रुपये (८० वॉट), 12GB+256GB व्हेरियंटला ४२ हजार ९९९ रुपये (८० वॉट), आणि 12GB+256GB व्हेरियंटला ४३ हजार ९९९ रुपये (१५० वॉट) मध्ये लाँच करण्यात आले होते. परंतु, या हँडसेटच्या किंमतीत गेल्या वर्षी ४ हजार रुपयाची कपात करण्यात आल्यानंतर हा फोन अनुक्रमे ३४ हजार ९९९ रुपये, ३८ हजार ९९९ रुपये आणि ३९ हजार ९९९ रुपये किंमतीत विकला जात होता. आता या फोनच्या किंमतीत ३ हजार रुपयाची कपात करण्यात आली आहे. यानंतर या फोनच्या किंमती कमी झाल्या आहेत. अनुक्रमे ३१ हजार ९९९ रुपये, ३५ हजार ९९९ रुपये, आणि ३६ हजार ९९९ रुपये आहे. तुम्ही स्मार्टफोनला फॉरेस्ट ग्रीन आणि Sierra Black दोन रंगात खरेदी करू शकता.

वाचाः Mi 32 Inch Smart TV मिळतोय अर्ध्या किंमतीत, अशी ऑफर पुन्हा नाही

OnePlus 10R Specifications
या फोनमध्ये १२० हर्ट्ज पर्यंत डायनामिक रिफ्रेश रेट सोबत फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस (1080×2412 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेंसिटी ८१०० मॅक्स प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या फोनमध्ये तीन रियर कॅमेरा दिले आहे. ज्यात 50MP Sony IMX766 प्रायमरी सेन्सर सोबत 8MP Sony IMX355 अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मायक्रो सेन्सर मिळेल. १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी दिला आहे. या फोनमध्ये १५० वॉट सुपरवूक चार्ज सपोर्ट दिला आहे. ज्यात ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोनची बॅटरी फक्त ३ मिनिटात ३० टक्के पर्यंत चार्ज होते, असा कंपनीचा दावा आहे. ८० वॉट फास्ट सपोर्टचा व्हेरियंट ५००० एमएएच क्षमते सोबत येते. ३२ मिनिटात फुल चार्ज होते.

वाचाः आजपासून ट्विटरमध्ये Twitter Blue Tick सह हे पाच बदल, पाहा डिटेल्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.