Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आता परिस्थिती अशी आहे की ‘कैथी’ नावाच्या दाक्षिणात्य सिनेमाच्या या रीमेकने जर शनिवारी आणि रविवारी (०१ आणि २ एप्रिल २०२३) चांगली कमाई केली नाही, तर बॉलिवूडच्या फ्लॉप सिनेमांच्या यादीमध्ये ‘भोला’चेही नाव समाविष्ट होईल. पहिल्या वीकेंडला सिनेमाच्या कमाईत जर ४०-५० टक्के वाढ झालीच, तरच या सिनेमाची बुडती नाव वाचू शकते. अजय देवगणची फॅन फॉलोइंग आणि स्टारडम पाहता शनिवारी-रविवारी चांगली कमाई झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
भोलाने दोन दिवसात किती केली कमाई?
एक दिग्दर्शक म्हणून ‘भोला’ अजयचा चौथा सिनेमा आहे. हा सिनमा ‘कैथी’ या दाक्षिणात्य सिनेमाचा रीमेक आहे. तर याआधी त्याचा ‘दृश्यम २’ हा मुव्हीदेखील मल्याळम सिनेमाचा रीमेक होता, तरीही दृश्यम २ ने बॉक्स ऑफिसवर २०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केलेला. मीडिया रिपोर्टनुसार भोलाने दोन दिवसात १६.५० कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. रामनवमीच्या दिवशी विविध राज्यांमध्ये सुट्टी असते, या दिवशी सिनेमा प्रदर्शित होऊनही अनेक प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवली. दुसरे एक कारण म्हणजे रमजानच्या महिन्यामुळे सिनेमाचे नुकसान झाले असण्याचा अंदाज आहे, कारण अनेकांचे रोजे असल्याने फिल्म बघण्यासाठी बाहेर पडणे प्रेक्षक टाळतात.
‘भोला’ बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्ट
गुरुवार, पहिला दिवस- १० कोटी रुपये
शुक्रवार, दुसरा दिवस- ०६.५० कोटी रुपये